The news is by your side.

नगरसेवक फिरोजखान याच्यासह तिघांवर विनयभंगचा गुन्हा दाखल!

0 17

अकोला : अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवाबपुरा येथील रहिवासी तथा प्रभाग क्रमांक चे काँग्रेसचे नगरसेवक फिरोज खान अलियार खान यांच्या सह तीन जणांंविरुद्ध हरिहर पेठ मधील रहिवासी असलेल्या माहेलेंचा विनयभंग करून शस्त्राचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरिहर पेठ येथील किरण सिंग ठाकूर यांची अकोला ते पातूर रोडवरील,अमनदीप ढाब्याजवळील शेती व्याजने पैसे देऊन,याप्रकरणातील आरोपींनी बळकावून ताबा मिळवला होता.याविरोधात किरणसिंग ठाकुर यांनी जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल करून,यातील आरोपींविरुद्ध अवैध सावकारी कायद्याखाली प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने किरणसिंग ठाकुर यांच्या बाजुला निर्णय देऊनही, फिरोजखान सह यातील आरोपी किरणसिंग ठाकूर यांना शेतीचा ताबा देत नव्हते, त्यावर किरणसिंग ठाकूर यांनी, न्यायालयात पोलीस संरक्षण देऊन आमची शेती त्यांच्या ताब्यात देण्यासाठी अर्ज केला होता.न्यायालयाने ठाकुर यांचा अर्ज मंजूर करून, त्यांना पोलीस संरक्षण दिले होते.त्यावरून १९सप्टेंबरच्या दुपारी दोन वाजता दरम्यान पोलीस संरक्षणात शेतीची मोजणी करून ताबा घेण्यासाठी किरण सिंग ठाकूर आणि त्यांचे कुटुंबीय शेतात गेले असता,नगरसेवक फिरोजखान आणि त्यांच्या सहकाNयांनी हातात तलवारी व पाईप घेऊन हैदोस घालण्याच्या तयारीत असताना, जूनेशहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले,त्यावेळी त्याठीकाणी उपस्थित असलेल्या पीडित महिलेला वाईट उद्देशाने हात धरून ओढत आत नेत असल्याची तक्रार पीडित महिलेने दाखल केल्याने नगरसेवक फिरोजखान याच्यासह तीन जणांविरुद्ध कलम ३५४ ,४(२५)आर्म अ‍ॅक्ट,३४नुसार १९सप्टेंबर च्या रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून,यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी,यातील मुख्य आरोपी फिरोजखा खान अलियार खान फरार आहे.जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहरचे डीबी पथक आरोपींचा शोध घेत आहेत.