The news is by your side.

गोळीबार प्रकरण:एपीआय नागलकर यांना जामीन

0 16

अकोला: लाच प्रकरणात कारवाई साठी गेलेल्या पोलीस पथकावर पोलीस ठाण्यातच गोळीबार करून एका शिपायाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी १२ जून पासून कारागृहात असलेले एपीआय आरोपी नंदकिशोर नागलकर यांना जिल्हा न्यायालयाने सशर्त अटीवर जामीन मंजूर केला.
नागलकर हे पिंजर येथे ठाणेदार असताना अवैध धंद्याना उत आला होता.रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी नागलकर यांनी पैशाची मागणी केली होती. यानंतर रेती व्यवसायिकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार एसीबी पोलीस कारवाई करण्यासाठी पंचसमक्ष ठाण्यात पोचले असता बिथरलेल्या नागलकर यांनी आपल्या सव्र्हिस रिव्हॉल्वर मधून एसीबीच्या कर्मचाNयांवर गोळी झाडली असा आरोप आहे.पिंजर ठाण्यात नागलकर विरुद्ध ३०७,३३८,१८६ व ३५३ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी कारागृहात काढणाNया नागलकर यांना अखेर जामीन मंजूर केला.आरोपी नागलकर यांच्यावतीने अ‍ॅड. अजय लोंढे यांनी बाजू मांडली.