The news is by your side.

शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाNयांनी बुजवला अपघातास निमंत्रण देणारा मुख्य रस्त्यावरील खड्डा

0 11

अकोला: अकोला शहरातील सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपूलाच्या बांधकामा मुळे शहर वाहतूक कर्मचाNयांना वाहतूक नियंत्रित करतांना, तारे वरची कसरत करावी लागत आहे, अकोला शहरातील मुख्य वाहतुकीचे मार्ग असलेला जेल चौक ते टॉवर चौक हा मार्ग उड्डाणपूल बांधकामा मुळे व नेकलेस रोड हा नवीन सिमेंट रोड बांधकामा मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे शहर वाहतूक शाखेवर वाहतूक नियंत्रित करण्याची मोठी जबाबदारी आहे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत तर काही नियुक्त केलेल्या पॉईंटवर रात्री १० वाजे पर्यंत सतत कार्यरत असतात, अश्यातच सतंत.धार पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मुळे आणखी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, अशोक वाटिका चौकात असाच एक भला मोठा खड्डा अपघातास निमंत्रण देत होता, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करीत होता, नेमकी ही बाब त्याठीकाणी कत्र्यव्यावर असलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चिकटेआणि रघुनाथ ढोरे यांनी इतर कुठल्या शासकीय विभागावर विसंबून न राहता आज २ मजूर लावून सदर मोठा खड्डा बुजवून वाहतुकीस होणारा अडथळा दूर केला,त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.