The news is by your side.

विधानसभा निवडणुकीकरिता यंत्रणा सज्ज-अभयसिंह मोहिते

0 52

मुर्तिजापूर : आचारसंहिता सुरू झालेली असून विधानसभा निवडणुकी करीता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये चार भरारी पथकांचा समावेश असून दोन भरारी पथके मूर्तिजापूर आणि दोन भरारी पथके बार्शिटाकळी तालुक्यात कार्यरत राहणार आहेत. तर स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये ३ पथके सज्ज असून ही पथके बिडगाव, कुरुम आणि बार्शिटाकळी येथील कासमार या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. सदर सर्वेक्षण पथक २४ तासात जवळपास ३०० वाहनांची तपासणी करणार आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी निवडणुकीत केली जाणार असून आचारसंहितेचा भंग करणाNयांवर कारवाई करण्यात येणार आहे. उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळाव्यात करिता एक खिडकी परवानगी योजना राबविण्यात आली आहे. या एक खिडकी मध्ये सभा,रॅली,बॅनर, पोस्टर, वाहने प्रचार कार्यालय आदीबाबत परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सुविधा अ‍ॅप द्वारा देखील सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या निवडणुकीकरिता तीन व्हिडिओ शूटिंग पथक कार्यरत राहणार असून गरज पडल्यास आणखी मदत घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहा पोलिस स्टेशनचे अधिकारी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. काही तक्रारी असल्यास त्यासाठी सीबीआयजीआयएन अ‍ॅप्स द्वारा तक्रारी करू शकताळ या तक्रारींची शंभर मिनिटात शहानिशा केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्र्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी आज दिनांक २६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दिनांक ६,७,१२,व१३ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये ३८६ मतदान केंद्र राहणार आहेत. पूर्वी ४०१ मतदान केंद्र होती परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती ३८६ करण्यात आलेली आहेत. दिनांक २७ सप्टेंबर पासून ११ ते ३ या वेळात दिनांक ४ ऑक्टोबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. त्यामध्ये तीन दिवस सुटी आल्याने पाच दिवसात नामनिर्देशनपत्र दाखल करावे लागणार आहेत. मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारास एक सूचक तर नोंदणीकृत पक्षांच्या आणि अपक्षांना दहा सूचक राहणार आहेत. बोगस किंवा हेराफेरी केलेली कागदपत्र दाखल केल्यास नामनिर्देशन पत्र तात्काळ रद्द करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दिनांक १४ व १५ ऑक्टोबरला मतदान यंत्र सज्ज करण्यात येतील. छाननी दि.५ तारखेला होऊन दिनांक ७ रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. मतदात्यांनी मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा उपयोग करून जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. सोबतच जवळपास पंचवीसशे ते तीन हजार अपंग मतदारांकरिता वेगळी व्यवस्था राहणार असल्याचे सांगितले. यावेळी मुर्तीजापुर तहसीलचे तहसीलदार प्रदीप पवार व बार्शीटाकळी येथील तहसीलदार जी.के. आमंद यांची उपस्थिती होती.