The news is by your side.

पुण्यात अतिवृष्टीमुळे १४ जणांचा मृत्यू ,९ बेपत्ता

0 3

पुणे: पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना काल रात्री धुवांधार पावसाचा फटका बसला. शहरांसह ग्रामीण परिसरातील सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले, नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १४ जण दगावले असून ९ जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची ५ पथके कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी म्हणाले, यावर्षी २२ वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात धरणे भरली. काल रात्रीचा पाऊस मात्र खूपच होता. यावर्षी जिल्ह्यात सरासरी १८० टक्के पाऊस झाला आहे. कालच्या पावसामुळे जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील ६, हवेली तालुक्यातील ६, पुरंदर तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे.या पावसाचा फटका जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांना बसला आहे. पाच तालुक्यातील ५९ गावे बाधित झाली आहेत. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कNहा नदीच्या पात्रात ८५ हजार क्युसेक पाणी वाहत होते. या कNहा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला. दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात ३८ निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या शिबिरात २ हजार ५०० नागरीकांना स्थलांतरीत करण्यात आले. तर पुणे शहरातील ३ हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. जिल्ह्यातील १ हजार १ कुटुंबांतील ३ हजार ६५ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने सलग दुसNया दिवशी शहर आणि परिसरात हाहा:कार उडवून दिला. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले. मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. पद्मावती परिसरात आंबिल ओढ्याची सीमा भिंत कोसळल्याने काही सोसायट्यांमध्ये दुसNया मजल्यापर्यंत पाणी शिरले. त्याबरोबरच तावरे कॉलनी, सहकारनगर, लक्ष्मीनगर, दांडेकर पूल वसाहत या भागांमध्ये पाणी शिरले असून जवळपास निम्मे शहर जलमय झाले. पोलिस व अग्निशामक विभागाच्या जवानांनी नागरिकांची सुटका करण्यासाठी धाव घेतली आहे. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे.