The news is by your side.

सर्वोपचारच्या बालकांच्या वॉर्डात ऑक्सिजन सिलींडरचा पाईप लिकेज झाल्याने धावपळ!

0 1

चिमुकल्यांना घेवून पालकांना वॉर्डाबाहेर काढला पळ

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयाच्या बालकांच्या वॉर्डमध्ये शुक्रवारी ऑक्सिजन सिलींडरचा पाईप लिकेज झाल्याने या वॉर्डात एकच धावपळ उडाली. त्यामुळे या चिमुकल्यांच्या पालकांनी त्यांना घेवून वॉर्डाच्या बाहेर पळ काढला.
अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयाच्या २२ क्रमांकाच्या बालकांच्या वॉर्डात शुक्रवारी दुपारी ऑक्सिजनचा पाईप लिकेज होण्याची घटना घडली. याची माहिती होताच या वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या लहान मुलांना घेवून त्यांच्या पालकांनी वॉर्डाच्या बाहेर धाव घेतली. यावेळी एकच गोंधळ उडाला. याची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यावर त्याठिकाणी पोहोचलेल्या डॉक्टरांनी हरा लिकेज त्वरित नियंत्रणात आणला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काही वेळातच सर्व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. परंतु गॅसची गळती झाल्याच्या चर्चेने लहान बालकांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला होता, त्यामुळे काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सर्वोपचार रुग्णालयातील ईईजी मशीन बंद
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात गेल्या अनेक दिवसांपासून असलेली ईईजी मशीन बंद असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे ही मशीन तत्काळ सुरू करण्यात यावी, याबाबत महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे अध्यक्ष आशिष सावळे यांनी जिल्हाधिकाNयांकडे ऑनलाइन तक्रार केली आहे.अकोला जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातून सर्वोपचारमध्ये येणाNया रुग्णांची संख्या अधिक आहे. सर्व आरोग्य सुविधांनी युक्त रुग्णालय म्हणून सर्वोपचारकडे पाहिले जाते. मात्र, येथील मनोविकृती विभागात असलेली ईईजी मशीन ही २००७ पासून बंद आहे. मानसिक आजार, रुग्णांची चिडचीड होणे, डोक्याला मार लागणे, बेशुद्ध असणे अशा रुग्णांच्या तपासणीसाठी या मशीनचा वापर केला जातो. मात्र, मशीन बंद असल्याने तपासणीसाठी कोणताही फायदा होत नाही. शासन रुग्णांसाठी कोट्यवधींचा खर्च करते. दरम्यान गरीब रुग्णांच्या सोईसाठी लवकरात लवकर ही मशीन सुरु करावी, अशी मागणीही सावळे यांनी केली आहे.

रॅगिंग प्रकरणात तीन विद्यार्थिनींना ‘शो-कॉज’ नोटीस
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या छळ प्रकरणाशी संबंधित तीन विद्यार्थिनींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या एका केरळ येथील विद्यार्थिनीचा तिच्याच सहकाNयांकडून छळ होत असल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले. हे रॅगिंग प्रकरण उजेडात आल्यानंतर एका उच्चस्तरीय समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येऊन प्रकरणाची चौकशी केली व अहवाल वैद्यकीय संचालकांकडे सादर केला. त्यानंतर संबंधित तीन विद्यार्थिनींवर पहिल्यांदाच ही कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीची एक बैठक पार पडली असून, त्यामध्ये रॅगिंग प्रकरणातील संबंधित तीन विद्यार्थिनींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तसेच सहकाNयांसोबत ड्युटी करण्यास नकार दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी दिली आहे.