The news is by your side.

उमरी भागातील दोन वरली मटक्याच्या अड्ड्यांवर छापा

0 5

११ आरोपींना अटक, पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

प्रतिनिधी/८ नोव्हेंबर
अकोला: मोठी उमरी येथील महाकाली सायकल स्टोअर्स समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्ळा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज दुपारी छापा मारला. यावेळी पाचजणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये दिनेशकुमार राजकुमार जैन (वय ५२ वर्ष) रा.मोठी उमरी, शिवाजी पुतळ्याच्या पाठीमागे, अकोला; आनंद लक्ष्मण घरडे (वय ५५ वर्ष) रा.महात्मा फुले नगर, मोठी उमरी, अकोला; अभिजीत समाधान टिकार (वय २६वर्ष) रा.मते कॉम्प्लेक्स, मोठी उमरी, अकोला; विनोद देविदास सोनोने (वय ४५ वर्ष) रा.गुरुदेव नगर, मोठी उमरी, अकोला आणि भिकाजी महादेव जोंधळे (वय ५० वर्ष) रा चिंचोली गणु ,पो स्टे बाळापुर, ह.मु महाकली मंदीरसमोर, मोठी उमरी, अकोला यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून वरली मटक्याचे आकडे लिहिलेले चिठ्ठी बुक, चिठ्ठ्या व इतर साहित्य तसेच एवूâण नगदी ६,७७० रूपये दोन विविध कंपन्यांचे मोबाईल किंमत १८,००० रुपये, मोटर सायकल बजाज डिस्कव्हर नं एम एच ३० एडब्ल्यू १५८१, किंमत ३५,००० रुपये असा एकुण ५९,७७० रूपयांचा माल जप्त केला. दरम्यान, लहान उमरी येथील श्रीहरी कॉम्पलेक्स समोरील गजानन टी सेन्टर या ठिकाणीही सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पथकाने छापा मारला. यावेळी गणेश रामकृष्ण पिंपळकर (वय ४८ वर्ष), रा.भागिरथ नगर, गुडधी; सुभाष श्रीराम खवले (वय ४०वर्ष), रा.निबंधे प्लॉट, लहान उमरी, अकोला; मनोहर नामदेव हंतोडे (वय ५५ वर्ष) रा.निबंधे प्लॉट, लहान उमरी, अकोला; संतोष शामराव डिगे (वय ४८ वर्ष) रा.निबंधे प्लॉट, लहान उमरी अकोला; गोपाल राजन्ना गोडबोले (वय ४९ वर्ष), रा.निबंधे प्लॉट, लहान उमरी, अकोला आणि राजेन्द्र नामदेवराव रोहनकार (वय ४४ वर्ष) रा.घाटोळ वाडी, लहान उमरी, अकोला यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून वरली मटक्याचे आकडे लिहिलेली डायरी ,वरली मटक्याचे आकडे लिहिलेल्या एवूâण ५ चिठ्ठ्या, विविध कंपन्यांचे एवूâण ५ मोबाईल, किंमत ५००० रूपये तसेच नगदी एवूâण ७,६१० रूपये, विविध कंपन्यांच्या दोन मोटर सायकल एकुण किमत १,१०,००० रूपये असा एकुण १,२२,६१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकंदरीत दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये एवूâण १,८२,३८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.अटक केलेल्या ११ जुगारींवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.