The news is by your side.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा अखेर राजीनामा; राज्यात राजकीय अस्थैर्याची परिस्थिती!

0 6

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यामुळे आता राज्यात काळजीवाहू सरकार अस्तित्वात आले असून, त्याची धुरा देवेंद्र फडणवीस हेच सांभाळणार आह्रेत, परंतु विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंवूâन मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आजही सत्तास्थापनेचा दावा केला नाही, उलट फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय अस्थैर्याची परिस्थिती कायम असल्याचे दिसते. दरम्यान, राज्यात सरकार कोणाचं येणार हे आता राज्यपाल जे काही ठरवतील त्यानंतरच स्पष्ट होईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. सत्ता स्थापनेबाबत आज दिवसभरात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संवाद साधला आणि आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते.यावेळी थोरात म्हणाले, आज देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री बनले आहेत; मात्र आता यानंतर राज्यपालांनी घटनेनुसार प्रक्रिया राबवली पाहिजे. यापुढे राज्यपाल काय पाऊल उचलतात हे पहावं लागेल. राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आम्ही पवारांशी चर्चा केली.
शिवसेना-भाजपाची विचारधारा वेगळी आहे, आमची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याबाबत चर्चा करुन काय ते ठरवले जाईल. याबाबत शरद पवारांसोबत सर्वसाधारण चर्चा झाली. अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.