The news is by your side.

राम मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त झाला – संजय धोत्रे

0 13

अकोला: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेला आदेश म्हणजे कोणाचा जय किंवा पराजय नाही. प्रत्येकाने शांतता राखून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले आहे. या निर्णयाने राम मंदिराचा मार्ग प्रशस्त झाल्याची प्रतिक्रिया धोत्रे यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये न्यायालयाच्या निर्णया संदर्भात जी भावना व्यक्त केली होती, ती प्रत्यक्षात होऊन लवकरच अयोध्येत मंदिर निर्माण होणार असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले आहे. नवीन भारतासाठी एकजुटीने सर्व लोक या निर्णयाचा सन्मान करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

ऐतिहासिक निकाल आमदार रणधीर सावरकर
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाचे आमदार रणधीर सावरकर यांनी स्वागत केले आहे. राष्ट्रीय अखंडता व संस्कृती रक्षणासाठी सर्वोेच्च न्यायालयाने सर्व बाबी तपासून हा ऐतिहासिक निकाल देऊन न्याय दिल्याची प्रतिक्रिया आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली.
मंदिरासाठी संघर्ष करणाNयांंना न्याय मिळाला- आमदार गोवर्धन शर्मा
सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणी दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मंदिरासाठी अनेक वर्षापासून त्याग, बलिदान आणि संघर्ष करणाNयांना खNया अर्थाने न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली.
‘हा’ जनमताचा
आदर – अ‍ॅड. नरेन्द्र बेलसरे
अयोध्यातील वादग्रस्त जागेवर राममंदिरच होते, हे पुरातन काळातील पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. या निर्णयामुळे भारतातील जनमताचा आदर झाला असून, सर्वांनी शांतता व सलोखा कायम ठेवावा, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत करायला हवे.
योग्य निर्णय – अ‍ॅड. प्रकाश वखरे
देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनासाठी अतिशय चांगला निर्णय कोर्टाने दिला आहे, निर्णयाचे स्वागतच करायला पाहिजे तसेच पाच एकराच्या जागेबाबत कोर्टाने जागा निश्चितीबाबत स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती.
ऐतिहासिक निकाल – मोतीसिंग मोहता
सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेपासून आजपर्यतचा सर्वात ऐतिहासिक व चांगला निर्णय कोर्टाने दिला आहे. या निर्णयामुळे देशातीrल नागरिकांचा सन्मान झाला, कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह आहे.
समानता राखणारा
निकाल – बी. के. गांधी
सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे कोणाचेही नुकसान झालेले नाही. आजचा निकाल हा देशवासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे, सर्वांंनी सलोखा कायम ठेवावा.
लोकहिताचा
निर्णय -अ‍ॅड. हेमंत सपाटे
सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निकाल हा लोकहिताचा निर्णय आहे, या निर्णयामुळे सामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला. उशिरा का होईना तमाम भारतातील लोकांना न्याय मिळाला. निकाल देताना न्यायालयाने दोन्ही पक्षामध्ये समानता राखली.