The news is by your side.

परतीच्या पावसाने हादरून गेला पणज व बोचरा परिसर!

0 15

प्रतिनिधी/९ नोव्हेंबर
अकोट: आकोट तालुक्यातील ग्राम पणज व बोचरा या परीसरात गेल्या १० ते १५दिवसा पासून सतत पाऊस सुरू असल्याने या परीसरातील महत्त्वाचे पिक म्हणजे ज्वारी, सोयाबीन ,कपाशी , लिंबू ,तुर ,केळी या महत्वाच्या पिकांचे शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबरला सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकNयांनी बँक कर्ज पिक कर्ज काढून तसेच उसनवारी करून पैशाची जुळवाजुळव करून छातीला माती लावून शेतीची मशागत व पेरणी केली होती .परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकNयांचे हिरवे स्वप्न साकार होऊ नाही शकले.
शेतकNयांचे नगदी पीक म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या केळी या पिकासाठी महाराष्ट्रात पणज व बोचरा या परीसराची आगळी वेगळी ओळख आहे. म्हणून हा परीसर केळी या पिकासाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर कपाशी, तुर ,ज्वारी, लिंबू ,सोयाबीन पानपिंपरी या पिकांचे अवकाळी पावसामुळे व वादळी वाNयामुळे प्रचंड नुकसान झाल्याने या परिसरातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे .तसेच यावर्षी परतीच्या अवकाळी पावसाने शेतकNयांचा घात केला आहे. यामुळे शेतकNयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे तर या पावसामुळे कपाशीचे बोंड काळे पडले व ज्वारी ,सोयाबीला कोंब फुटल्याने चांगले पीक शेतकNयांच्या हातातून गेली आहे. विजेच्या कडाडा सह व वादळी वाNयाच्या व तसेच अवकाळी पावसाच्या धुमाकूळा मुळे या परीसरातील पिके चिंताजनक आहेत. यामुळे शेतकNयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे तसेच शासनाने शेतकNयांना सरसकट पिक कर्जासह इतरही शेती विषयक कर्ज माफ करावे तसेच शासनाने शेतकNयांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे. पणज सह बोचरा, वाघोडा, शहापूर गैरखेड या परिसराला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अकोट अंजनगाव मार्गावरील महत्त्वाची नदी म्हणजे सातपुडा पर्वतातून येत असलेली बोर्डी नदी या नदीला पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आल्याने याठिकाणी पूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. चौथ्यांदा हा बोर्डी नदीवरील पुल वाहून जात असल्याने प्रवासी व नागरीकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणखी किती वेळा हा पुल वाहून जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे .ठेकेदाराच्या मणमाणी कारभारामुळे या पुलाचे बांधकाम गेल्या एक वर्षापासून कासवाच्या गतीने सुरू आहे परंतु कोणताच लोक प्रतिनिधी किंवा अधिकारी या समस्या कडे लक्ष देत नसल्याने या ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. हा पूल अनेक वेळा पुराच्या तडाख्याने वाहून गेल्याने अनेक वेळा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती व प्रवाशांना तसेच नागरिकांना विद्याथ्र्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला तरी मात्र ठेकेदाराकडून कोणत्याच प्रकारचे पाहूल उचलण्यात आले नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे व ठेकेदारांचे काम मात्र कासव गतीने सुरु आहे .तसेच वारंवार ग्रामपंचायत ची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तुटत असल्याने गावात मात्र मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे तरीदेखील ठेकेदाराचे काम मात्र आपल्या मर्जीने सुरू असल्याने वेगळे चित्र याठिकाणी दिसत आहे.