The news is by your side.

अयोध्या प्रकरणाच्या निर्णयाचा सर्वांनी मान राखावा

0 12

जिल्हा पोलिस अधीक्षक गावकर यांचे आवाहन

प्रतिनिधी/९ नोव्हेंबर
अकोला: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय कोणाच्याही हार विंâवा जीतचा नाही. या निर्णयाचा सर्वांनी सन्मान राखावा, अकोला जिल्ह्यात शांती आणि सुव्यवस्था यासोबतच बंधूभाव कायम राखावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, की सर्वांनी या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे. सोशल मीडियावर प्रतिबंध लावण्यात आलेले नाहीत परंतु शांती कायम रहावी तसेच रविवारी शहरात ईदचा जुलूस आहे, यावेळी एकतेचा संदेश देवून बंधूभाव कायम ठेवावा, आगामी ५ दिवसांपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाची मंजूरी देण्यात येणार नाही. त्यामध्ये रॅली, मोटारसायकल रॅली, महाआरती आदि कार्यक्रमांना पोलिस प्रशासनाद्वारे अनुमति दिली जाणार नाही. अकोला जिल्ह्यात कुठेही पोस्टर्स वा बॅनर्स लावण्याची अनुमति मिळणार नाही. अकोला जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत सकारात्मक भावना आहेत. पोलिस प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करता यावी यासाठी जुलूसला परवानगी देण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागरिकांनीही भयमुक्त वातावरणात राहावे, फटाके फोडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासन द्वारे विनंती करण्यात आली असून, सर्वजण सहकार्य करतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी एलसीबी प्रमुख शैलेश सपकाळ उपस्थित होते.