The news is by your side.

घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

0 6

यवतमाळ: भरदिवसा घरफोडी करणाNया बुलडाणा जिल्ह्यातील आंतरराज्यीय टोळीला यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात असलेले ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी या टोळीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.
गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या धाडसी चोNयांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चोNया तत्काळ उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. घरफोडी करणाNया गुन्हेगारांचा सुगावा लावण्यासाठी या पथकाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्याचे अभिलेख पडताळण्याचे काम हाती घेण्यात आले. चोरी करणाNया गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती घेत असतानाच १५ ऑक्टोबर २०१९ ला पुसद शहरातील शिवाजी नगर व श्रीनगर या भागात अवघ्या ४ तासामध्ये पाच बंद घरे फोडून दिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे घरफोड्या करणाNया अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पथकासमोर होते.तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे चोरी करणारे आरोपी हे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेतील विशेष पथकाने चार ते पाच दिवसांपासून वेशांतर करून मेहकर येथे तळ ठोकला. गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गोपनीय माहितीच्या आधारे टोळी प्रमुख किशोर वायाळ रा. मेरा. ता. मेहकर, जि. बुलडाणा, आकाश प्रकाश पवार व राजू इंगळे रा. बNहाई ता. मेहकर जि. बुलडाणा अशा ३ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव, उमरखेड हद्दीत ११ ठिकाणी दिवसा घरफोड्या केल्याची कबुल दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली १ कार, २ मोटार सायकल, ९७ ग्राम सोने व ५५० ग्राम चांदी असा एकूण ८ लक्ष ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.