The news is by your side.

अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0 5

अकोला: हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून त्यांना जिवंत जाळले. या घटनेचे पडसाद शहरातही उमटले. मातोश्री मित्र परिवारातर्फे आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच हा खटला जलद न्यायालयात चालवावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात मोर्चा काढून जिल्हाधिकाNयांना निवेदन आले. हैदराबाद येथील घटनेने निर्भया घटनेची पुनरावृत्ती झाली. डॉ. प्रियंका रेड्डी या युवतीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले. या घटनेमुळे देशातील महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा समोर आले आहे. तर कायद्याचे भय गुन्हेगारांना नसल्याचे समोर येत आहे. यासाठी शहरातील मातोश्री मित्र परिवारातर्फे संस्थापक अध्यक्ष योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी मोर्चेकNयांनी केली.