The news is by your side.

कर्जमुक्ती; भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देणार

0 9

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ग्वाही

मुंबई: राज्यातील शेतकNयांंना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज त्यांच्या अभिभाषणातून दिली.
आज विधानभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण झालं. राज्यपालांनी त्यांचं संपूर्ण भाषण मराठीत केलं. यावेळी त्यांनी नव्या सरकारचे आणि निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन करीत नव्या सरकारचे भविष्यातील संकल्प मांडले. अवघ्या २० मिनिटाच्या या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांंना हात घातला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर आमचं सरकार काम करेल, असं सांगतानाच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकNयांना नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकNयांच्या शेतमालाला योग्य हमी भाव देण्यात येईल. तसेच शेतकNयांना कर्जमुक्तीच नव्हे तर चिंतामुक्त करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. मराठवाडा आणि विदर्भात शाश्वत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातील आर्थिक स्थिताचा आढावा घेण्यात येणार आहे. हा आढाव घेऊन त्याचा अहवाल मांडण्यात येणार असल्याचंही राज्यपालांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं. राज्यात रोजगार निर्मिती ही सध्याची चिंतेची बाब आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून शासनातील रिक्तपदे भरण्यात येईल. भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यात येईल, असं ते म्हणाले. राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचं राज्यपालांनी स्पष्ट केलं. शिवसेनेने निवडणूक काळात दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली होती. त्याचं प्रतिबिंब राज्यपालांच्या भाषणात उमटलं आहे.