The news is by your side.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

0 5

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. आज विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने आपणाकडे पक्षाचे विधीमंडळ पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे पत्र दिले, अशी माहिती पटोले यांनी सभागृहाला दिली आणि फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड जाहीर केली. फडणवीस यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी या प्रस्तावावेळी भाषणही केलं. त्यानंतर सभागृहातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.