The news is by your side.

अवघ्या १५ तासांत केंद्राचे ४० हजार कोटी परत केले : ‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ देवेंद्र फडणवीस पुन्हा वादाच्या भोवNयात!

0 14

भाजप खासदार हेगडेंच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
फडणवीसांनी आरोप पेâटाळले

बेंगळुरू: ‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ म्हणून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असतानाच कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. ‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते, असा दावा हेगडे यांनी केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना हेगडे यांनी ही खळबळजनक माहिती दिली. ते म्हणाले, की ‘महाराष्ट्रात आमचा माणूस फक्त ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता, हे सर्वांनाच माहीत आहे. नंतर त्यांनी राजीनामाही दिला. हे सगळं नाटक त्यांनी का केलं? आपल्याकडं बहुमत नाही हे आम्हाला माहीत होतं. तरीही फडणवीस मुख्यमंत्री का झाले, असा प्रश्न सगळे करताहेत. तर त्याचं उत्तर आहे, ४० हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी!’ ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात त्यावेळी केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचं सरकार तिथं आल्यास त्या पैशांचा दुरुपयोग केला जाईल. विकासासाठी ती रक्कम वापरली जाणार नाही, हे त्यांना माहीत होतं. त्यासाठीच हे सगळं नाट्य घडवून आणलं गेलं. हा प्लान खूप आधीच ठरला होता. त्यानुसारच फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या १५ तासांत केंद्राचे ४० हजार कोटी परत केले गेले,’ असंही हेगडे म्हणाले.
चाळीस हजार कोटींच्या निधीचा मुद्दा
हिवाळी अधिवेशनात गाजणार!
केंद्राया ४० हजार कोटींच्या निधी प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु झाली असून ते भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, हा मुद्दा आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.
फडणवीस म्हणतात, हेगडेंचा ४० हजार
कोटींचा दावा धादांत खोटा!
मुंबई: महाराष्ट्राकडे असलेले केंद्र सरकारचे ४० हजार कोटी परत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचे मुख्यमंत्री झाले होते, हा खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दावा फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. ‘हे सगळं धादांत खोटं आहे. महाराष्ट्राचा एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपच्या खासदारानंच हा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिवसेनेचा हल्लाबोल: अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर भाजप पुन्हा शिवसेनेच्या रडारवर आला आहे. ‘विकासकामांसाठी मिळालेला पैसा पुन्हा केंद्र सरकारला पाठविण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला असेल तर ती महाराष्ट्राशी बेइमानी आहे. त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार नाही. याबाबत मुख्यमंत्री खुलासा करतील. यात काळंबेरं नक्कीच आहे. सत्य समोर येईल,’ असं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे सांगितलं. हेगडे यांच्या वक्तव्याचा हवाला देत त्यांनी याबाबत ट्विटही केलं आहे.

…तर पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागेल – नवाब मलिक
मुंबई : महाराष्ट्राच्या विकास कामासाठी आणि शेतकNयांच्या मदतीसाठी आलेला ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत गेला असेल, तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाय उतार व्हावे लागेल, अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.महाराष्ट्रासाठी आलेला निधी खरच परत गेला असेल, तर केवळ महाराष्ट्र नाहीतर तामिळनाडू, ओडिशा अशा गैरभाजप शासित राज्यांवर अन्याय केल्यासारखे होईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

ही दुख:द आणि खेदजनक बाब – तटकरे
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी खरोखरच केंद्राने राज्य सरकारकडे पाठविलेला ४० हजार निधी परत पाठविला गेला असेल तर ही दुख:द आणि खेदजनक बाब असल्याचं म्हटलं आहे.‘खरच फडणवीस यांनी केंद्राकडे निधी परत केला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ही खेदजनक बाब आहे. राजकारण जिथे करायचंय तिथे नक्की करावं. पण महाराष्ट्रातील शेतकरी सर्वसामान्य मजूर गरीब असून त्याला मदत मिळण्याच्या बाबातीत कोणी राजकारण करत असेल तर त्याचा निषेधच करायला हवा,’ असं मत तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.