The news is by your side.

अट्टल चोरट्यांंना तीन दिवसाचा पीसीआर

0 4

अकोला : शहरातील नगर परिषद कॉलनीतील झालेल्या चोरीतील दोन अट्टल चोरट्यांंना खदान पोलिसांनी अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चोरट्यांंना तीन दिवसाचा पीसीआर सुनावला आहे.शहरातील नगर परिषद कॉलनीत प्रशांत वसंतराव डंबेलकर, शैलेश अक्षय मिश्रा यांच्या घरांमध्ये अज्ञात चोरट्यांंनी हैदोस घालत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी डंबेलकर व मिश्रा यांच्या तक्रारीवरून खदान पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नदीम बेग कलीम बेग, अब्दुल रिजवान अब्दुल अकील रा. सोनटक्के प्लॉट या दोघांना अटक केली आहे.या दोन चोरट्यांंचे साथीदार फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चोरट्यांंनी चोरीची कबूली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक दुचाकी व १२ हजार रुपयांची चांदी जप्त केली आहे. आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ५ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर सुनावला आहे.