The news is by your side.

… तर हात तोडण्यापर्यंत आंदोलन करू! विरोधी पक्ष नेता साजिद खान यांचा इशारा

0 13

अकोला: सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास मनपा कार्यालयासमोर धरणे, घेराव, काम बंद इत्यादि आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिला आहे. मनपातील सफाई कामगारांच्या अनेक मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी या कामगारांनी सोमवारी मनपा आयुक्तांना भेटीची वेळ मागितली होती परंतु महानगरपालिका सफाई कामगारांना मनपा आयुक्तांनी दिलेल्या वेळेवर भेटू न दिल्याने तसेच प्रलंबित मागण्या दिलेल्या वेळेवर पूर्ण केल्या नसल्याने सोमवारी या मनपा सफाई कामगारांनी मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमोर त्यांच्या गाडीच्यापुढे बसून नाराजगी व्यक्त करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.दरम्यान, विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी या सफाई कामगारांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मनपा प्रशासनाला हात जोडण्यापासून हात तोडण्यापर्र्यंत आंदोलन करु असे आश्वासन दिले.