The news is by your side.

पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या प्रश्नावरुन आ. देशमुखांनी अधिकाNयांना धरले धारेवर!

0 12

अकोला: पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या प्रश्नावरुन आ. नितीन देशमुखांनी अधिकाNयांना चांगलेच धारेवर धरले. ररखडलेल्या पिक विमाची रक्कम, पंचनाम्यामधील त्रुटी आणि रखडलेले पंचनामे यांचा अहवाल न झाल्यामुळे संतप्त शेतकNयांनी सोमवारी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक वाघ यांना आमदार देशमुख आणि प्रभारी जिल्हाधिकाNयांनी शेतकNयांचे प्रश्न तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अकोट, तेल्हारा, पातूर आणि बाळापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
पंचनाम्यांमध्ये त्रुटी असल्यामुळे अकोट तालुक्यातील केळी व फळ पिकाच्या दाव्याची रक्कम मिळालेली नाही. यामुळे पंचनाम्यातील त्रुटी काढून चार डिसेंबरला अकोट येथील शेतकNयांंचे नवे पंचनामे करून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला व जिल्हाधिकाNयांना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक वाघ यांनी आमदार देशमुख व जिल्हाधिकाNयांना दिली. तसेच फळपिकांचे पावसामुळे झालेले नुकसानाचे पंचनामे ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचेही वाघ यांनी यावेळी सांगितले. सोबतच पातूर आणि बाळापूर या दोन तालुक्यातील सन २०१७-१८ मधील शेतकNयांना मदतीचे पैसे मिळाले नाहीत. या दोन तालुक्यातील १६७ गावांमधील दुष्काळी मदत रखडली असल्याने याबाबत आढावा घेऊन शेतकNयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही वाघ यांनी आमदारांसह उपस्थित शेतकNयांना सांगितले.या बैठकीला शिवसेनेचे दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली अकोट आणि पातुर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकNयांच्या मागणीसाठी आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा कृषी अधीक्षक आणि प्रभारी जिल्हाधिकारी यांची ही संयुक्त बैठक घेतली होती.