The news is by your side.

जुगारावर छापा, सात जुगारी अटकेत

0 13

विशेष पथकाची कारवाई
२ लाख ७३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला : मूर्र्तिजापूर तालुक्यातील अनभोरा शेतशिवारात सुरू असलेल्या सुरू असलेल्या जुगारावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी करून सात जुगारींना अटक केली. पोलिसांनी जुगाNयांकडून २ लाख ७३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनभोरा शेतशिवारामधील राजेश पिल्ले यांच्या शेतात जुगार खेळला जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने छापेमारी करून सात जुगारींना अटक केली. राजेश शंकर पिल्ले (४५) रा. वडर पुरा, दिनेश गोपाल शुक्ला (५५) रा.स्टेशन विभाग, बक्कु कोळीराम गुंजाळ (५६) रा.वडर पुरा, शेख ईरफान शेख कयुम (३५) रा. परदेशी पुरा, भारत येलया गुंजाळ (४५) रा. वडरपूरा, अनील सुखदेव चNहाटे (५६) रा. ग्रामसेवक कॉलनी, श्याम गोपालराव अघाते (४२) रा. दातवी सर्व ता. मूर्र्तिजापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यावेळी त्यांच्याकडून २८ हजार ३०० रोख, २ लाख १५ हजारांच्या पाच मोटार सायकली, ३० हजार किंमतीचे सात मोबाईल, जुगार साहित्य असा एवूâण २ लाख ७३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यांच्यावर मूर्र्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.