The news is by your side.

पणज परिसरात आढळला बेवारस युवकाचा मृतदेह

0 19

अकोट: पणज येथील शहापूर प्रकल्पामधील चांबार माळी नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
गुरुवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी पणज परिसरातील शहापुर वाघोडा परिसरातील चाबार माळी च्या नदीच्या पात्रात एक अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती पणज सह परिसरात वाNयासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना पणज येथील माजी पोलिस पाटील पंजाबराव बोचे यांनी दिली. माहिती मिळताच ठाणेदार ज्ञानोबा फड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी झालेल्या घटनेची आणि घटना परिसराची पाहणी केली. एएसआय विजय पंचबुद्धे व विकास गोलोकर यांनी घटनास्थळी येऊन या युवकाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन राठोड व ठाणेदार ज्ञानोबा फड , पीएसआय धर्माजी डाखोरे यांनी घटनास्थळी येऊन मृताचे शवविच्छेदन केले. मृतकाच्या अंगात कथीया रंगाचा पँट आणि आकाशी रंगाची बिना कॉलर ची टी-शर्ट होती. यानंतर पणज येथील सरपंच प्रदीप ठाकूर यांनी मृतदेह दफन करण्याकरिता ई क्लासची जागा उपलब्ध करून दिली.स्मशानभुमी जवळील बाजूच्या जागेमध्ये या मृतक युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रदीप ठाकूर पीएसआय डाखोरे, विकास गोलोकार, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे होमगार्ड व नागरिक तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणी पोलसिांत मर्ग नंबर ५२ कलम १७४ जाफो दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे करीत आहेत.