The news is by your side.

अज्ञात चोरट्यांनी केले ८० हजाराचे दागिने लंपास!

0 5

अकोला:शहरातील मानेक टॉकीजच्या मागे असणाNया हनुमान बस्तीतील एकाच्या घरातून अज्ञात आरोपीने ८० हजारांची सुवर्ण आभुषणे लंपास केल्याची घटना गुरुवार, ५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईल खान अकबर खान, रा. हनुमान बस्ती हे काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते. ते परत आले असता त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांनी घरात पाहणी केली असता त्यांच्या घरातून ८० हजारांची सुवर्ण आभुषणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळले. याप्रकरणी त्यांनी रामदास पेठ पोलिस स्टेशनला माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी अज्ञात चोरट्यां ंविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.