The news is by your side.

इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडणाNया तीन चोरट्यांंना अटक

0 3

अकोला : शहरातील अलंकार मार्केटमधील इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान अज्ञात चोरट्यांंनी फोडून रोख रकमेसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, असा एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी तीन चोरट्यांंना १३ जानेवारीला अटक केली आहे.
अलंकार मार्केटमध्ये ठाकूरदास परमानंद बालानी, रा. सिंधी कॅम्प यांचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान आहे. १० जानेवारीला रात्री ९.३० वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास एक टीव्ही आणि इतर महागडे साहित्य आणि रोख चार हजार रुपये असा एकूण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी शेख जुनैद शेख निजाम (२४), साहेब खा अहमद खा (२०), फैजल शाह, अफसर शाह या तिघांना अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून २४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, सपोनि नरेंद्र पदमने, शेख हसन, प्रशांत इंगळे, गजानन खेडकर, किशोर सोनोने, शेख अंन्सार, स्वप्नीrल चौधरी यांनी केली.