The news is by your side.

एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरण:चंदनसह तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज पेâटाळला!

0 7

अकोला: एमआयडीसी येथील क्षेत्रीय अधिकारी दर्जाच्या पाच अधिकाNयांनी संगनमत करून भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करीत खोट्या व बनावट नोंदी करून कोट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप करीत घोटाळा केल्यानंतर यामधील तीन बडे अधिकारी अद्यापही फरार असून, पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. तीनही अधिकाNयांंनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने त्या तिघांचेही जामीन अर्ज पेâटाळले आहेत. त्यामध्ये कुंदा किशोर वासनिक अमरावती, कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन, रा. सुधीर कॉलनी अकोला व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर रा. नागपूर या तिघांचा समावेश आहे.
अकोला एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक टीए ७८, टीए ४६, एन १५४, एन १६० या भूखंडाच्या वाटपामध्ये तसेच मुदतवाढ प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा किशोर वासनिक रा. गणपती नगर लॉड्र्स होस्टेलजवळ अमरावती, अमरावतीचे तत्कालीन क्षेत्र व्यवस्थापक दिलीप चेंडुजी पाटील (रा. उमरेड जि. नागपूर), अमरावतीचे अतिरिक्त कार्यभार क्षेत्र व्यवस्थापक गजानन भास्कर ठोके (रा. साई नगर मंदिराजवळ अमरावती), रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन (रा. दत्तकृपा सुधीर कॉलनी विवेकानंद आश्रम शाळेजवळ) अकोला व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर (रा. मालेवाडा रोड नागपूर) या पाच बड्या अधिकाNयांविरुद्ध एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुळके यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व अधिकाNयांनी संगनमत करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी नियमबाह्य कृत्य करून बनावट दस्तऐवज तयार केले व ते दस्तऐवज खरे असल्याचे सांगून फसवणूक केली, या भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाNयांविरुद्ध भूखंड घोटाळाप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड क्रमांक टीए ७८ या भूखंडाचे कागदपत्रे कार्यालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचे सागून एक हजार चौरस मीटरचा भूखंड वाटपपत्राद्धारे श्रीमती कृपा शहा मे श्री कृपा लाजिस्टिक यांना करण्यात आल्याचे दाखविले. हा घोटाळा सहायक क्षेत्र व्यवस्थापक अविनाश चंदन याने केला. दरम्यान या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली तर उर्वरीत तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयाने तिघांचेही अर्ज पेâटाळले आहेत.