The news is by your side.

पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण सोडत

0 10

अकोला: अकोला जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समित्यांच्या सभापती पदाकरिता आरक्षण सोडत आज छत्रपती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच पंचायत समिती गणातुन निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
सोडती नंतर पंचायत समित्यांचे सभापती पदाकरिता जाहीर आरक्षण पुढीलप्रमाणे:
पंचायत समिती अकोट – अनुसूचित जाती (महिला) , पंचायत समिती तेल्हारा– नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पंचायत समिती अकोला – नागरिकांचा मागास प्रवर्ग, पंचायत समिती मूर्तिजापूर – सर्वसाधारण , पंचायत समिती बाळापूर – सर्वसाधारण (महिला), पंचायत समिती बार्शिटाकळी – अनुसूचित जाती, पंचायत समिती पातूर – अनुसूचित जमाती .