The news is by your side.

जि.प. भाजप गटनेतेपदी मायाताई कावरे

0 8

अकोला: अकोला जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या गट नेते पदी सौ. मायाताई रामदास कावरे यांची एकमताने निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेते पदी नियुक्ती झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांना भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी दिले. सौ.मायाताई कावरे यांच्या नियुक्ती बाबत केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ रणधीर सावरकर, आ प्रकाश भारसाकळे, आ हरीश पिंपळे तसेच संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठीकर यांचे सोबत चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. या वेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ. मायाताई कावरे, सौ कोमल गोपाल पेठे, सौ. सुलभ रमेश दुतोंडे, वंदना गणेश झळके, प्रकाश गंगाराम आतकड, पावन माधवराव बुटे, रायसिंग रामराव राठोड, रवी गावंडे, डॉ बाबुराव शेळके, श्रीकृष्ण मोरखडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.