The news is by your side.

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते

0 16

शरद पवार यांचे विधान

सातारा: ‘मला ‘जाणता राजा’ म्हणा असं मी कुठेही, कोणालाही म्हटलेलं नाही. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा कुणी नीट अभ्यास केला तर त्यांना हे ज्ञात होईल की छत्रपती यांची उपाधी ‘शिवछत्रपती’ ही होती, ‘जाणता राजा’ अशी कधीच नव्हती. ‘जाणता राजा’ हे बिरुद रामदास स्वामींनी शिवरायांना दिलं आणि मी हेही सांगतो, की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर त्यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. शिवरायांचं व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडवलं आहे,’ असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद सुरू झाल्यानंतर लेखक आणि भाजप नेते जयभगवान गोयल यांनी ते मागे घेतलं असलं तरी वादाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आज सातारा येथील सभेत शरद पवारांनी वरील विधान करून या विषयाला पुन्हा तोंड फोडले आहे. शरद पवार बुधवारी सातारा दौNयावर आले असताना बोलत होते.
… तर त्या सर्व पुस्तकांवर बंदी घाला – मुनगंटीवार
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते पुस्तक स्वत: लिहिलं नव्हतं आणि माझी तुलना शिवाजी महाराजांशी करा असंही सांगितलं नव्हतं. मात्र त्या पुस्तकाच्या आडून नरेंद्र मोदींवर जशी टीका करण्यात आली ती योग्य नव्हती,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी तर मुख्यमंत्र्यांना असं पत्र पाठवलंय, की जितकी म्हणून अशी पुस्तकं महाराष्ट्रात असतील, ज्यात कोणा नेत्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली असेल, त्या सर्व पुस्तकांवर बंदी घाला. अशी पुस्तकं असतील, एखाद्या बिअर बारला शिवाजी महाराजांचं नाव असेल, अशा सर्व गोष्टींवर बंदी घाला. महाराजांची ब्रह्मांडापर्यंत कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.’

शरद पवार यांचे विधान

प्रतिनिधी/१५ जानेवारी