The news is by your side.

तूर खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशीसाठी बार्शीटाकळी तहसील समोरधरणे.

0 81

बार्शीटाकळी प्रतिनिधी 10 ऑगस्ट:-बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाच्या मार्फत तूर खरेदी करताना, प्रचंड प्रमाणात अनियमितता आणि शासनाच्या नाफेड मार्फत करण्यात आलेल्या तूर खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी , बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बार्शीटाकळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाच्या मार्फत झालेल्या तूर खरेदीत,अनियमितता, भ्रष्टाचार करून पात्र शेतकऱ्यांची तूर खरेदी न करता खरेदी विक्री संघातील लोकप्रतिनिधी,कर्मचारी आणि अधिकारीयांनीआपल्या मर्जीतील व्यापारी आणि नातेवाईक यांची तूर खरेदी करून ,नाफेडच्या तूर खरेदी पासून पात्र लाभार्थ्यांना यांना वंचित ठेवल्याचा आरोप बार्शीटाकळीचे तहसीलदार यांना निवेदनाव्दारे करण्यात आला.तूर खरेदीत खरेदी विक्री संघामार्फत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी, या अगोदर मुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री, अकोला जिल्हा उपनिबंधक, मा सहाययक निबंधकआणि अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने, हे आंदोलन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.ज्या शेतकऱ्यांची ऑन लाईन नोंद होऊन तूर खरेदी केली,त्यांच्या तूर खरेदीचे चुकारे त्वरित देण्यात यावे,अशीही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. या आंदोलनात कृषक शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश मानकर सह बार्शीटाकळी तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.