The news is by your side.

अकोल्याच्या पालकमंत्री बच्चू कडू,यांचे स्वीय सहाययक मातेचे अनोखं आंदोलन!

0 901

अकोला प्रतिनिधी:-अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे आपल्या अनोख्या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यात परिचित आहेत.त्याचाच एक भाग की काय,अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाययक राजेश खुमकर यांच्या मातोश्रीने चक्क त्यांची दुचाकी स्कुटर आणि छोटा ट्रॅक्टर आडवा उभा करून,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाचे बांधकाम बंध करीत अनोखं आंदोलन केल्याने हा विषय अकोला जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की,अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमांक२७०९ वर निंबा फाटा ते उरल दरम्यान एका पुलाचे बांधकाम सुरू आहे.या पुलाचे काम गेल्या दोन वर्षपासून सुरू आहे.या पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी बाळापूर उपविभागीय अधिकारी यांच्या कडे या कालावधीत कोणत्याही प्रकारची हरकत घेण्यात आली नाही.परंतु अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या स्वीय सहाय्यक पदी नव्यानेच नियुक्ती पदी विराजमान झालेल्या राजेश खुमकर यांच्या मातोश्रींनी या पुलाच्या पोच भरण्याचे काम सुरू असताना, या पुलाच्या कामात माझ्या मालकीच्या शेतीचा भाग जात असल्याचे सांगून चक्क स्कुटर आणि ट्रॅक्टर आडवा उभा करून हे काम बंद केल्याने,या पुलाच्या कामाला ब्रेक लागल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना आणि या परिसरातील सिंचन प्रकल्पाला याची झड बसणार असून,याप्रकरणात पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घालून हा गुंता सोडविण्याची मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.