The news is by your side.

बौद्ध युवकाच्या हत्याकांडाचा तीव्र निषेध:मारेकNयांंना कठोर शिक्षा करा – रामदास आठवले

0 52

मुंबई: औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा गावात गरीब बौद्ध कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.त्यात भीमराज गायकवाड या निर्दोष विद्याथ्र्याचा मृत्यू झाला. मानवतेला काळिमा फासणाNया या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करून हल्लेखोरांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. हल्ल्यात मृत भीमराज गायकवाडचे वडील बाळासाहेब गायकवाड, आई अलका गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. गायकवाड कुटुंबातील मोठ्या मुलाचे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून जातीवादी मानसिकतेतून हा हल्ला आरोपींनी केला आहे. अत्यंत अमानुष, निंदनीय, मानवतेला काळिमा फासणारा हा हल्ला असून, हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी मी करीत आहे. हल्ला झाल्याचे समजल्यानंतर काल त्वरित तेथील औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षकांशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून त्वरित सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करून बळीत भीमराज गायकवाड कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची सूचना केली आहे. याप्रकरणी मृत भीमराज गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी डीवायएसपी यांना निवेदन देऊन आपल्या जीवाला धोका असून हल्ला होण्याची शक्यता वर्तवुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करणाNया पोलीस अधिकाNयांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.

जनता कफ्र्यू हा रामबाण उपाय
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कफ्यू ही सुचविलेली संकल्पना स्वागतार्ह आहे. उद्याच्या रविवारी २२ मार्चला सर्व देशवासीयांनी बाहेर न पडता घरातच थांबण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या देशात कोरोना विषाणू च्या साथीचा दुसरा टप्पा आहे. या पुढे तिसNया टप्प्यात जाणे धोकादायक ठरेल. त्यामुळे पंतप्रधानांनी सुचविलेला घरीच थांबण्याचा जनता कफ्र्यू हा उपाय कोरोना ची लागण रोखण्यासाठी रामबाण उपाय ठरेल. त्यामुळे सर्वांनी जनता कफ्र्यूची अंमलबजावणी येत्या रविवारी करावी असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.