The news is by your side.

देशात लॉक-डाऊन वाढण्याची शक्यता!व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे,ब्लु प्रिंट सादर करण्याचे राज्यांच्या मुख्यमंत्री यांना सूचना!

0 174

नवी दिल्ली१२मे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढविला जाऊ शकतो,असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या त्याच्या ट्विटर दिले आहेत. सध्या सुरु असलेला लॉकडाऊन हा १७ मेपर्यंत आहे. पण यात पुन्हा एकदा वाढ केली जाऊ शकते. असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून मिळत आहेत. पंतप्रधान मोदींनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी दीर्घ चर्चा केली. यावेळी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान या मुद्द्यावरही चर्चा झाली. यावेळी मोदींनी राज्यांना ब्लू प्रिंट सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. लॉकडाऊन वाढविण्याचे पंतप्रधान मोदींचे संकेत या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जीव आवश्यक पावलं उचलणं गरजेची होती ती दुसऱ्या टप्प्यात राहिली नाही. तसंच तिसर्‍या टप्प्यात आवश्यक असलेल्या गोष्टींची गरज चौथ्या टप्प्यात भासणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाईल. परंतु त्यात इतर अनेक सवलती देण्यात येतील. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी १५ मे पर्यंत विविध राज्यांकडून सूचना मागविल्या आहेत