महाराष्ट्रात लॉक डाऊनचा कालावधी ३१मे पर्यंत असणार!
मुंबई१७मे:-कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी२२मार्च पासून सुरू असलेला लॉक डाऊन३१मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तशा प्रकारचा आदेश राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी काढला असून,राज्यातील सर्व विभागांना तसे पत्र देण्यात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी हा लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. लॉक डाऊन चा हा टप्पा ३१मे२०२०च्या मध्यरात्री पर्यंत असणार आहे,असं मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.काल एकाच दिवशी१६०६रुगणांची वाढ झाल्याने, राज्य सरकारची चिंता वाढली असून,काल झालेली कोरोना बाधित रुग्णाची वाढ ही सर्वाधिक होती.आज रोजी राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या३०हजाराहून अधिक झाली असून,कोविड-१९च्या विषाणूने १हजारापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तिसऱ्या टप्प्याच्या टाळे बंधीची मुदत आज संपणार आहे.गेल्या२२मार्च पासून महाराष्ट्रासह देशात टाळेबंदी सुरू असून, कोरोनाचा कहर अजून तरी थांबलेला नाही.देशातील कोरोनाबाधित रुगणांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत,त्यापैकी राज्यातील महत्त्वाचे समजली जाणाऱ्या मुंबई, पुणे,औरंगाबाद, नागपूर शहरातील कोरोनाबाधित रुगणांची संख्या चिंता वाढविणारी असल्याने लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.