लॉकडाऊन काळात१५हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई! १५००वाहने तात्पुरत्या कालावधी साठी जप्त!
अकोला प्रतिनिधी१७मे:-कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी देशासह,राज्यात गेल्या २२मार्च पासून लॉक डाऊन करण्यात आला असून,या लॉक डाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणास्तव सूट देण्यात आली आहे. याचाच गैरफायदा घेत काही नागरिक प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याच्या घटना अकोला शहर वाहतूक शाखेच्या वाहनांची तपासणी आणि वाहनधारकांची चौकशी दरम्यान समोर आल्या आहेत.लॉक डाऊन दरम्यान महत्त्व पूर्ण कारणाशिवाय नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर येणार नाहीत,याची जवाबदारी पोलीस विभागावार सोपविण्यात आली आहे.अतिशय महत्त्वाच्या कारणाशिवाय कोणीही लॉक डाऊन दरम्यान घराबाहेर पडणार नाही,असे शासनाच्या वतीने वारंवार सांगितले असूनही, कारण नसताना काही नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत. यासर्व बाबींचा आढावा घेत लॉक डाऊन दरम्यान कोणीही बाहेर योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाही,आणि लॉक डाऊन आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन कारणाऱयांवर निर्देश अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी अकोला शहर वाहतूक शाखेला दिले होते.त्याप्रमाणे अकोला शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी लॉक डाऊन दरम्यान रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची तपासणी करून वाहनांची कागद पत्रे जवळ न बाळगणे,ठोस कारण नसताना वाहने रस्त्यावर आणून लॉक डाऊन चे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करून शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांच्या महसुलाची भर घातली आहे.दरम्यानच्या काळात योग्य कारणाशिवाय रस्त्यावर आणलेली वाहने सात दिवसासाठी उभी करून सोडून देण्यात आली आहेत.तर एकवेळ कारवाई करून पुन्हा विनाकारण रस्त्यावर आलेली वाहने लॉक डाऊन संपेपर्यंत नियोजित ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आली आहेत.कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी अकोला शहर वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांनी योग्य कारणाशिवाय तसेच मास्क लावल्याशिवाय तसेच शोषल डिस्टिंग चे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. लॉक डाऊन काळा दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन अकोला शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.