देशी दारूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या१० जणांना अटक! तीन लाखापेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त!
अकोला प्रतिनिधी२२मे:-कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लॉक डाऊन केल्यामुळे मद्य प्रेमीची चांगलीच दमछाक होत आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, अकोला महानगरपालिका क्षेत्रातील दारूची दुकाने बंद करण्यात आली आहेत,त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात अवैध पणे दारूची विक्री करणारे, ज्या भागातील दारूची दुकाने सुरू आहेत,अशा ठिकाणाहून दारूची मिळेल त्या वाहनाने वाहतूक करून, मद्य प्रेमींची दारूची गरज पूर्ण करून आपले खिशे गरम करीत आहेत,अशाच प्रकारे कापशी(रोड)येथून देशी दारूची अवैध पणे दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची माहिती, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकार यांना मिळाली,त्या माहितीच्या आधारे२१मेरोजी त्यांनी त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी यांना कापशी ते माझोड फाटा त्याच प्रमाणे कापशी ते अकोला रोडवरील दत्तात्रेय पेट्रोल पंपा जवळ नाका बंदी करून कापशीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना थांबवून झडीतीत १०इसम देशी दारूची वाहतूक करतांना मिळून आले, यामध्ये आकाश सुभाष डाबेराव,रा.बेलुरा,ता.पातूर, नंदू सुभाष बरगे, रा.वाडेगाव,अब्दुल अजीम अब्दुल कादर रा.हमजा प्लॉट जुने शहर अकोला,फयाज खान नवाज खान रा.गाडगे नगर अकोला,लखन अशोक गायकवाड रा.हरिहर पेठ जुने शहर अकोला,शेख इकबाल शेख अकील रा.जेतवन नगर खदान अकोला,सुमित भागवत शिंदे रा.म्हैसपूर, बाळू बळीराम कोतवाल, रा.म्हैसपूर,अनिल शेषराव वानखडे, रा कान्हेरी(सरप) यांचा समावेश असून, त्यांच्या कडून देशी दारू सह दुचाकी वाहने असा मिळून 3लाख४ हजार८४०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,त्यांच्या विरोधात पातूर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.