The news is by your side.

अकोट आगारातून एसटी बसेस पुन्हा धावणार!

0 452

अकोट प्रतिनिधी२२मे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते,त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या होत्या, परंतु आता जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव न झालेल्या नॉन रेड झोन म्हणून घोषित काही तालुक्या मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याचे आदेश आज रोजी विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला कार्यालयांच्या निर्देशानुसार , अकोला जिल्यातील अकोट तेल्हारा ,मुर्तिजापूर या नॉन रेड झोन भागात उद्यापासून लाल परी (बसेस) पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे, अकोला महानगर परिक्षेत्र वगळता अकोट उपविभागात प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे
यात ५०% आसन क्षमतेचा अर्थात २२ आसनाचा ( एका बाकावर एकच व्यक्ती) वापर करण्याच्या शासनाच्या सूचना असल्याचे म्हटले आहे,
सदर ची वाहतूक ही सोशल डिस्टन्सिंग चे काटेकोर पालन केले करीत, सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे आदेशात सांगण्यात आले आहे,ल.
अकोट आगारातून सुरू होणारी वाहतूक ही अकोला शहर वगळता फक्त अकोट ते गांधीग्राम पर्यंतच धावणार असून ,शेगाव वगळता फक्त अकोट ते निंबाफाटा पर्यंतच, आणि अकोट तेल्हारा मार्गे सर्व थांबे घेत प्रवास वाहतूक होणार आहे,
अकोट आगारातून सकाळी ७ वाजता पहिली बस सॅनिटाइझ करून मार्गस्थ होणार असून, सदर मार्ग अकोट ते तेल्हारा, अकोट ते निंबा फाटा, अकोट ते तेल्हारा या मार्गावर २० ते २२ फेऱ्या एका दिवसाला होणार असल्याचे आगार प्रमुख यांनी कळविले आहे,
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासन आदेशानुसार बस प्रवासात १० वर्ष आतील, व ६० वर्षावरील व्यक्ती यांना प्रवास करता येणार नसल्याचे आगार प्रमुख सुनील भालतीलक सांगितले आहे.