The news is by your side.

ऑनलाईन मद्य विक्रीचे नियम धाब्यावर ! इनकम टॅक्स चौकातील रुची वाईन शॉपवरून खुलेआम दारू विक्री! जिल्हा व पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद !

0 389

अकोला प्रतिनिधी२३मे:- लॉक डाऊनमुळे गेल्या२४मार्च पासून राज्यात मद्य विक्रीचे दुकाने आणि वाईनबार बंद करण्यात आले होते. यामध्ये शासनाच्या मोठया प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या महसूल बुडत असल्याने, ठाकरे सरकारने काही नियम व अटी लावून मद्य विक्रीसाठीवाईन शॉप अनुज्ञप्ती धारकांना ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे अशा ग्राहकांना घरपोच ऑनलाईन दारू विक्री साठी परवानगी दिली आहे.परन्तु अकोला शहरातील गोरक्षण रोड वरील इनकम टॅक्स चौकातील रुची वाईनशॉप येथे चक्क दुकानाचे शटर उघडून मद्य विक्री सुरू असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने ,ठाकरे सरकारच्या ऑन लाईन घरपोच मद्य विक्री नियमांचे पालन होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.यावेळी रुची वाईन शॉप मधून मद्य मागणी करणाऱ्या ग्राहकांना मागणी प्रमाणे १क्वॉर्टर आणि एक बियर ची बॉटल देण्यात आली, मद्य विक्री करीत असताना दारू पिण्याचा परवाना आहे किंवा नाही याची खातरजमा सुद्धा करण्यात आली नसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. सर्व प्रकार अकोल्यातील मद्य निर्मिती किंग यांच्या उपस्थितीत होत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाल्याने,अकोला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑनलाईन मद्य विक्री बाबत शासनाने ज्या ग्राहकांकडे दारू पिण्याचा परवाना आहे.अशा ग्राहकांना त्यांनी फोन वरून मद्याची मागणी केली असेल ती दारू,त्याने सांगितलेल्या ठिकाणी नियोजित दुकानाचे शटर न उघडता दारू देणे नियमांत आहे.परंतु रुची वाईन शॉप च्या मालकाने चक्क शटर उघडून दारू विक्री सुरू असल्याची बाब समोर आल्याने,शासनाने ठरवून दिलेल्या सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची धक्कादायक बाब कोरोनाच्या महामारीला आमंत्रण दिल्यासारखी झाली आहे.शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत मद्य विक्री केली त्याबाबत रुची वाईनशॉपच्या मालकांविरुद्ध अकोला जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.