The news is by your side.

अकोल्यात आणखी २० कोरोनाबाधित रुगणांची भर!  कोरोनाबधित रुग्णांची संख्या७४६ पोहचली!

0 50

अकोला ६मे : अकोला शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होत असल्याने अकोला जिल्ह्यावाशीयांची चिंता वाढली आहे. अकोला

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येचा आलेख वाढतच चालला असून, वाढण्याचे सत्र सुरुच असून, शनिवार, ६ जून सकाळी११ वाजेपर्यंत आणखी २० रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळेअकोला जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या७४६ झाली आहे. आजपर्यंत एकूण कोरोनाबधित रुग्णांच्या पैकी३३रुग्णांचा मृत्यू झाला असूनएका कोरोनाबधित रुग्णाने आत्महत्या केली आहे. एकूण रुग्णांच्या पैकी५०५रूग्ण बरे झाल्याने,त्यांना सुटी देण्यात आली आहे, तर२०७रुग्ण उपचार घेत आहेत, माहिती जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिली.संपूर्ण विदर्भात सर्वात जास्त कोरोनाबधित रुग्णांची संख्या अकोला जिल्ह्यात झाल्याने,अकोला जिल्हा हॉटस्पॉट ठरला आहे.६जून पर्यंत अकोला प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ,कोरोना बाधितआणखी २० रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ७४६ वर पोहोचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी ८९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६९ अहवाल निगेटिव्ह आहेत. ६जून शनिवारी सकाळी प्राप्त अहवालात सात महिला व १३ पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये पाच जण सिंधी कॅम्प, पाच जण देवी खदान, काला चबुतरा येथील दोन, डाबकी रोड येथील दोन जण, तर ताज नगर, बलोदे ले आउट, हरिहर पेठ, खदान, लकडगंज माळीपूरा व लेबर कॅम्प येथील प्रत्येकी एक जण रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेेेल्या अहवालात नमूद केले आहे.