The news is by your side.

भाजपाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन!

0 143

तेल्हारा ता६जून:- कोविड19 या साथी दरम्यान शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासा विषयी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आज ता 5 शुक्रवार रोजी तहसीलदार राजेश सुरळकर यांना देण्यात आले आहे.
तालुक्यातील पुनर्वसन गावात तातडीने मूलभूत गरजा पुरविण्यात यावे, तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा तूर, हरभरा , मका आदी पिकाची नोंदणी करून शेतकऱ्यांकडे असणाऱ्या धान्याचा शेवटच्या दाण्या पर्यंत शेतकऱ्यांचा माल शासनाने गतीने खरेदी करावा,वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या दुष्काळग्रस्त व गारपीटग्रस्त यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अनेक नागरिकांच्या रेशन कार्ड मध्ये असलेली काही नावे आर सी मधून वगळण्यात आली ती नावे त्वरित समाविष्ट करण्यात यावी, खारपान पट्ट्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, प्रधानमंत्री किसान योजनेमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभाचे पैसे तात्काळ जमा करण्यात यावी, तालुक्यामध्ये झालेल्या गारपीट मध्ये फळबाग नुकसान भरपाई फळ उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी, पिक कर्ज वाटप करताना बँकेने घातलेल्या अटी लॉक डाऊन दरम्यान पूर्ण करणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने सदर अटी शिथिल करण्यात यावे व पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज तात्काळ मंजूर करण्याबाबत बँकांना आदेशित करण्यात यावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. निवेदनावर भाजपा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार ,जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड,शहर अध्यक्ष ओम सुईवाल,नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे, धर्मेश चौधरी, पुंजाजी मानकर, गजानन नळकांडे, विजय देशमुख, रवी गाडोदिया, अतुल विखे, राजेश्वर घावट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.