The news is by your side.

अखेर मुंबईवर२६/११चा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला अमेरिकेत अटक! राणाला ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग

0 58

अँजेलिस२०जून:-सन२००८मध्ये २६नोव्हेंबर रोजी मुंबईवर अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या तहव्वुर राणाला१२वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर अमेरिकेत अटक करण्यात आली. त्याला भारताच्या स्वाधीन करण्याची शक्यता आहे. राणा याच्याकडे कॅनडा आणि पाकिस्तान असे दुहेरी नागरिकत्व असुन अमेरिका सरकारने२६/११च्या हल्ल्याप्रकरणात शिक्षाही ठोठावली असल्याची माहिती आहे. शिक्षा भोगल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. परंतु सोडुन दिल्यानंतर काही तासातच त्याला पुन्हा लॉस अँजेलिस शहरातून अटक केली आहे. अमेरिका सरकारने राणाला ठोठावलेली शिक्षा२०२१मध्ये संपणार होती,परंतु त्याला आगोदर जेल मधून सोडण्यात आले होते. अमेरिका सरकार भारताला सहकार्य करण्याच्या तयारीत असून, राणाला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.तहव्वुर राणाला मुंबईवर झालेल्या२६/११च्या मास्टरमाइंड असल्याच्या आरोपाखाली अमेरिकेत२००९मध्येच अटक करण्यात आली होती.२६/११च्या हल्ल्यात१६६लोकांना आपला जीव गमवावा लागला होता,यामध्ये काही अमेरिकी नागरिक सुद्धा मृत्यूमुखी पडले होते.मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले जाबाज पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांनी २६/११च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या अजमल कसाब या पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडले होते.या कारवाईत तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आले होते. तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाब याला जिवंत पकडल्याने भारताच्या हातात पाकिस्तान विरोधात मोठा आणि सबळ पुरावा आला होता.तसे सगळे कायदेशीर पुरावे भारताने पाकिस्तानला देऊन,अजमल कसाब विरोधात खटला चालऊन त्याला फाशी देण्यात आली. परंतु पाकिस्तानने अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक नसल्याचे सांगितले होते.२६/११च्या हल्ल्यात अमेरिकी नागरिक मृत्यू मुखी पडल्याने अमेरिकी न्यायालयाने २०१३मध्येच राणाला१४वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.राणा भारतात आल्यानंतर २६/११च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तान अभय देत असल्याच्या कारणावरून भारताला अधिक आक्रमक भूमिका घेता येणार आहे. राणाला भारतात आणण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, कायदे मंत्रालय आणि अमेरिका कायदे मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय आणि एकमेकांना विश्वासात घेऊन सर्व कागदोपत्री कारवाई करावी लागणार आहे, तेव्हाच राणाला भारतात आणता येईल असे कायदेतज्ज्ञ यांचे मत आहे.