The news is by your side.

लॉक डाऊनच्या काळातही वरली अड्डे जोमात! कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई! सिटी कोतवाली ठाणेदाराच्या कार्यक्षम तेवर प्रश्नचिन्ह!

0 97

अकोला प्रतिनिधी२जुलै:-अकोला शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतांनाही वरली अड्डे जोरात असल्याची बाब,कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या बंद करण्यात आलेल्या जनता भाजी बाजारात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने केलेल्या वरली अड्ड्यावर अधोरेखित झाली आहे.या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात सेक्स कॅंडल,बिल्डर दादाराव गवई हत्त्याकांड, अकोट फाईल मधील कुद्दुस हत्त्याकांडाचा यशस्वीपणे तपास करणारे कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार उत्तम जाधव यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असतांना अकोला शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम वरली मटका ठाणेदार यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात पोलीस वर्तुळात आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २जुलै२०२०रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद बाहाकार यांना त्यांच्या बातमीदार यांच्या कडून, गोपनीय महितीद्वारे माहिती मिळाली की, अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आणि आज रोजी बंद असलेल्या जनता भाजी बाजारात गीता नगर येथील रहिवासी अमित उर्फ अंब्या शाम सुरेखा हा त्यांने नियुक्त करण्यात आलेल्या इसमानांकडून कश्मीर लॉज आणि टॉवर दरम्यान येत असलेल्या जनता भाजी बाजारात मुबई, कल्याण आणि राज्यातून वरलीचे आकडे प्रसिद्ध होणाऱ्या वरलीची चिठ्ठी द्वारे खायवाळ घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद बाहाकार यांना मिळाली, त्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बाहाकार यांच्या चमूने अमित उर्फ अंब्या सुरेखा यांच्या वरली अड्ड्यावर धाड टाकली .या कारवाईत सटोड्या अंब्या उर्फ अमित सुरेखा याच्यासह राजेश जगदीश पाठक,अजय शंभूसिंग चव्हाण,संजय चरणदास लहुरकार,अरबाअली बरकतअली,नितीन डोडाया,जय मकुराम पटेल,बबलू जगदीश भगत,आशिष केशव पुरी,अशा प्रकारे८आरोपींना अटक करून,त्यांच्याकडून५५हजार६२०रुपये रोख,२६०००रुपयांचे मोबाईल आणि१ लाख८०हजार रुपयांच्या तीन दुचाकी असा एकूण२लाख६१हजार६२०रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.या सर्व आरोपींविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जुगार ऍक्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाचे प्रमुख मिलिंद बाहाकार यांच्या चमूने जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.