The news is by your side.

माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत टँकर मधून पेट्रोल डिझेल काढतांना ४ जण ताब्यात! जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई! डिझेल-पेट्रोल आणि टँकर सहित लाखोचा मुद्देमाल जप्त!

0 61

मूर्तिजापूर प्रतिनिधी४जुलै:-अकोला जिल्ह्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, अकोला ते अमरावती महामार्गावर स्थित असलेल्या यु.पी.धाब्यावर टँकर मधून पेट्रोल-डिझेल काढतांना ४जुलै२०२०रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाचे प्रमुख मिलिंद बाहाकार आणि त्यांच्या चमूने४इसमांना अटक केली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिली बाहाकार यांना गुप्त माहिती मिळाली की, मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या, यूपी धाब्यावर मुंबई, गुजरात आणि अकोला जिल्ह्यातील गायगाव येथील डिझेल-पेट्रोल डेपोतून येत असलेल्या टँकर मधून चोरट्या मार्गाने पेट्रोल-डिझेल काढून,त्याची बेकायदेशीर रित्या विक्री केली जाते,त्या माहितीच्या आधारे, दि४जुलै सापळा रचून मूर्तिजापूर ते कुरुम दरम्यान चिंचेखेड शिवारातील युपी धाब्यावर धाड टाकली असता,धाब्याचा मालक आणि टँकर चालक आणि आणखी २जण असे चार जण मिळून टँकर मधून पेट्रोल डिझेल काढतांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत टँकर,२०लिटर डिझेल प्लॅस्टिकच्या कॅन सहित,तसेच उर्वरित टँकर मध्ये असलेल्या डिझेल सहित इतरही साहित्य असा एकूण३८’३८,३१७रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, या कारवाईत धाबा मालक कलीमोद्दीन अलीमोद्दीन, वय५५वर्षे रा.माना,अक्षय भारत दमाने,वय २१वर्षे, रा.माना, रणबीर रामचारित्र चौहान,वय४०वर्षे, रा.तुलसीपाडा(भांडुप)मुबई,ह
मु.गायगाव, जिल्हा अकोला,अनिल राजनारायन यादव वय२०वर्षे,रा.शिवणी अकोला, यांना अटक करण्यात आली असून,त्यांच्या विरुद्ध भादवी कलम३७९,३४सह जीवनावश्यक वस्तू कायदा३,७ दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक मिलिंद बाहाकार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चमूने केली.

अकोला जिल्ह्यात असे अवैध पणे पेट्रोल डिझेल चोरी गायगाव डेपोला लागूनच होत असून,त्या ठिकाणाहून मोठया प्रमाणात पेट्रोल डिझेल काढण्यात येते, अकोला पासून ७५किलोमीटर अंतरावर असलेल्या या धंद्यावर कारवाई झाली,परंतु अकोला शहरापासून१० किलोमीटर अंतरावर असलेल्या गायगाव डेपोला लागूनच टँकर मधून अवैध पणे टँकरच्या खालच्या बाजूला लाकडी ठोकळा लावून आणि त्यानंतर वरच्या बाजूवरील झाकणामध्ये लोखंडी रॉड टाकून डिझेल आणि पेट्रोल काढणाऱ्या तेल माफियांच्या विरुद्ध कारवाई केव्हा होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.