The news is by your side.

अकोटात११ गोवंशाना जीवदान!
अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई!
गोवंशासाहित पावणे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त!

0 248


स्वप्नील सरकटे
अकोट प्रतिनिधी:-अकोट शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तलीसाठी अतिशय निर्दयीपणे वाहनात कोंबून आणलेल्या११गोवंशाना अकोट ग्रामीण पोलिसांनी जीवदान दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ही कारवाई अकोट ग्रामीण पोलिसांनी केली असून,या कारवाईत ११गोवंशासाहित एक टाटा४०७ चारचाकी वाहन,असा एकूण पावणे सहा लाखाच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६जुलै रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना त्यांच्या खबरी मार्फत गुप्त माहिती मिळाली की,धारानी पोपट खेड मार्गाने अकोट येथे कत्तलीसाठी गोवंशाना चारचाकी वाहनांतून कोंबून आणण्यात येत आहे,त्या माहितीच्या आधारे धारणी पोपटखेड मार्गावरील रुदाली फाट्यावर सापळा रचून धारणीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची नाकेबंदी करून तपासणी करण्यात आली, दरम्यान धारणीकडून अकोट कडे येणाऱ्या एम.एच.२९-टी-४३६४ क्रमांकाच्या टाटा-४०७ची नाकेबंदी दरम्यान झडती घेण्यासाठी,थांबविण्यासाठी इशारा केल्यावर, नमूद मालवाहू चारचाकी वाहनाचा चालकशेख इसाक शेख अशरफ, वय३०वर्षे, रा.मोहोळा ता.अकोट,जि अकोला हा वाहन,त्याच ठिकाणी सोडून पळून जात होता,त्याच वेळी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड आणि त्यांच्या चमूने पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता,टाटा४०७मध्ये गोवंशाना पाय आणि तोंड बांधून अतिशय निर्दयीपणे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली अटक आलेल्या चालकाने दिली आहे. अतिशय निर्दयीपणे कोंबून आणल्यामुळे११पैकी दोन बैलांचा मृत्यू टाटा-४०७मध्ये झाल्याची बाब समोर आली आहे,मृत्यू झालेल्या दोन बैलांचे शवविच्छेदन करून,त्या बैलांचा दफनविधी करण्यात आला आहे.उर्वरित९गोवंशाची अकोट येथील गोरक्षण मध्ये रवानगी करण्यात आली आहे.या कारवाईत अटक करण्यात आलेल्या शे.इसाक शे.अशरफ याच्या विरोधात पोलीस स्टेशन अकोट (ग्रामीण)मध्ये कलम५(अ)९ महाराष्ट्र प्राणी अधिनियम सहकलम११(१)(ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियम१९६० सहकलम११९महा.पोलीस अधिनियम१९५१,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,या कारवाईत९ गोवंश आणि टाटा-४०७सहित ५लाख७४हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे,एएसआय कैलास गोपनारायण,पो. कॉन्स्टेबल नंदकिशोर कुलट,रामेश्वर भगत,वाहन चालक विलास अस्वार यांनी केली,विशेष या कारवाईत वनविभागाचे आवारे सहभागी झाले होते.