The news is by your side.

साठे जयंतीवर सूर्योदय बालगृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न!

0 15

अकोला प्रतिनिधी:-२ऑगस्ट:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या जयंती पर्वावर शनिवारी कॉंग्रेसच्या जिल्हा अनुसूचित जाती विभागच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या दिनी स्थानीय सूर्योदय बालगृहात गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय बॅग, बालकांचे हकक पुस्तिका, नोट पड , एन95 मास्क आदी साहित्य वितरित करण्यात
आले.अ. भा.काँग्रेस कमिटी अनु. जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष व ऊर्जा मंत्री नितीन राऊत, प्रदेश काँग्रेस अनु जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश संयोजक तथा अकोला जिल्हा निरीक्षक भाई प्रदीप अंभोरे यां च्या सहकार्याने आयोजित या सोहळ्याची संकल्पना अनु.जाती.विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष आनंद वानखडे यांनी साकार केली. या गुण गौरव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस नेते अविनाश देशमुख, प्रा संजय देशमुख,प्रदेश संयोजक महेंद्र गवई, युवक महासचिव सागर कावरे, जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद अंजंनकर आदी उपस्थित होते.
आनंद वानखडे यांनी या उपक्रमाची माहिती प्रतीपादीत करून अण्णाभाऊंच्या विचारांची आज समाजाला खरी गरज असल्याचे सांगून उपस्थितांना आपल्या शुभेच्छा दिल्यात.संचालन अंकुश गावंडे यांनी तर आभार सूर्योदय बालगृहाचे अधीक्षक
शिवराज पाटील यांनी मानले.सामाजिक अंतर राखीत संपन्न या वितरण सोहळ्यात यावेळी गणेश कळसकर, महेंद्र सुतार, राजीव इटोले, सौरभ काळे, अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश गावंडे, प्रमोद बनसोड, किशोर तेलगोटे, प्रतीक सुरवाडे, प्रसाद इंगळे, प्रशांत देशमुख, सौ प्रतिभाताई देशमुख आदी उपस्थित होते.