The news is by your side.

जबरी चोरी करणाऱ्यांना दोन तासात अटक! तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना!

0 172

अकोला प्रतिनिधी२०सप्टेंबर:-तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, वाडी(अदमपूर)येथील वृद्ध दाम्पत्याला बळजबरीने घरात घुसून रोख रक्कम सह सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन चोरट्यांना दोन तासाच्या आत अटक करण्यात अकोला पोलिसांना यश आले.यातील थोडक्यात हकीकत अशी आहे की,तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या वाडी(अदमपूर)येथील प्रतिष्ठित नागरिक ताराचंद नारायनदास बजाज वय६२वर्षे,यांच्या घरात २०सप्टेंबर२०२०च्या रात्री दोन वाजता दरम्यान दोन इसम काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आले आणि ताराचंद नारायनदास बजाज यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला देशी कट्ट्याच्या धाक दाखवून, त्यांच्या तोंडावर चिकन टेप लावून त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून घरातील रोख रक्कम सह सोन्याचे दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती तेल्हारा पोलिसांना फोनव्दारे देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे क्षणाचाही विलंब न लावता,तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास देवरे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, घडलेल्या प्रकारची माहिती वायरलेस व्दारे संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना देण्यात आली,त्यानंतर तेल्हारा, अकोट,हिवरखेड आणि अकोट परिसरात नाकाबंदी करण्यात आली.बजाज कुटुंबियांनी चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांचे वर्णन पोलिसांना सांगितल्यावर तपासाची चक्रे जोरात फिरवून, तेल्हारा शहरातील शेगाव नाक्यावर वर्णन केलेले चोरटे नमूद दुचाकीने सुसाट वेगाने येत असल्याचे नाकाबंदी करीत असलेल्या तेल्हारा पोलिसांना दिसून आले, त्यांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता,चोरटे सुसाट वेगाने घोडेगावच्या दिशेने पळून गेले.याची माहिती तेल्हारा पोलिसांनी अकोट शहर,अकोट ग्रामीण,दहीहंडा,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दिली.त्यादिशेने अकोला पोलीस यंत्रणा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज झाली. एवढ्यात वर्णन केलेली मोटारसायकल आणि चोरटे हे अकोट ते अकोट मार्गावरील पळसोड फाट्यावर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड आणि त्यांच्या पोलीस पथकाने जबरी चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अस्लम उर्फ अहमद शहा, वय२१वर्षे आणि मुस्कान बी अस्लम शहा वय२० वर्षे, रा.इंदिरा नगर तेल्हारा,ह. मु.भीमनगर शिवणी अकोला यांना २९सप्टेंबरच्या सकाळी ६वाजता अटक केली, चोरट्यांकडून पोलिसांनी १ रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुस चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी आणि चोरी गेलेला सोन्याच्या६ अंगठ्या,एक सोन्याची पोथ, एक सोन्याचा गोडा हार, दोन सोन्याच्या चैन,एक नथ, बिंदी,कानातील कर्ण फुलांचे दोन जोड, तांदुळमणी पोथ,एक पीस पॅडल मणी पोथ,एक सोन्याचे पेंडॉल, कानातील साखळी जोड, चांदीचे 3वाट्या आणि ३ग्लास रोख १०हजार असा एकूण५लाख७०हजार ५००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,त्यांच्या विरोधात तेल्हारा पोलीस ठाण्यात क्रमांक२८७/२० भादवी कलम ४५२,४५८ ३९४ सह आर्म ऍक्ट कायद्याच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी अकोट विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील सोनोने,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ आणि अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानबा फड यांनी मोलाची कामगिरी बजावली. हे विशेष.