The news is by your side.

सातपुड्याच्या पायथ्यासी नदीत डोहात बुडून युवकाचा मृत्यू! ठाणेदार  फड यांनी काढला डोहातुन मृत्यूदेह बाहेर!

0 127

अकोट प्रतिनिधी२१सप्टें:-अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील रहिवाशी राम अरूण झापर्डे वय २२ वर्ष हा रविवार असल्याने सकाळी मित्रांसोबत सातपुडा पहाडात फीरण्यासाठी गेला होता,त्याठिकाणी गेल्यावर तो पोहण्यासाठी नदीत गेला. त्याला पाणी किती खोल आहे याचा अंदाज आला नसल्याने, तो युवक पोपटखेड खटकाली रोडवर पार बाबा नजिक नदीपात्रातील डोहात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 20 सप्टेंबर रविवार दुपारी घडली. घटनास्थळ हे चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असुन, चिखलदरा पोलीसाना घटनास्थळी पोहचण्यासाठी ऊशीर होत असल्याचे पाहुन ,घटनास्थळी स्वतः हजर असलेले अकोट तहसीलदार हरीश गुरव आणि अकोट ग्रामीण पो. स्टे. चे ठाणेदार ज्ञानोबा यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहता अखेर ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी स्वतः डोहात ऊडी मारून सतत एक तास पाण्यात राहुन राम अरूण झापर्डे यांचा शोध घेऊन अखेर त्या तरुणाचा मृत्यूदेह बाहेर काढला.अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी २०सप्टेंबर च्या सकाळी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पळसोड फाट्यावर जेरबंद केल्यावर काही तासातच बुडालेल्या तरुणाचा मृतदेह स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात उडी मारून काढला,या त्यांच्या कामगिरीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, यावेळी घटनास्थळी अकोटचे प्रभारी तहसीलदार हरीश गुरव पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे सह नंदु कुलट सह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या प्रमाणात आसेगाव येथील नागरीक उपस्थित होते .