The news is by your side.

हृदयविकारानंतर नियमित Sex फायद्याचं की तोट्याचं? नव्या संशोधनात पुढे आले फायदे! हृदयविकारानंतर पूर्ववत सेक्स लाईफ जगल्यास नंतर हृदयविकराचा झटका येण्याचा धोका कमी असतो, असं एका अभ्यासातून समोर!

0 273

तेल अवीव (इस्रायल), 26 सप्टेंबर : हृदयविकारानंतर पूर्ववत सेक्स लाईफ जगल्यास नंतर हृदयविकराचा झटका येण्याचा धोका कमी असतो असं एका अभ्यासातून समोर आहे. ज्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आधीप्रमाणेच सेक्स केल्यास पुन्हा झटका येण्याचा संभव असतो, असा समज समाजात प्रचलित आहे. पण नव्या अभ्यासानुसार जर तुम्ही हृदयविकारानंतर पूर्ववत सेक्स करू शकत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी आहे, असं नव्या संशोधनात स्पष्ट झालं आहे.
नियमित सेक्स लाइफ असणं आरोग्यदायी आहे आणि यामुळे तुम्ही दीर्घकाळ जगू शकाल, असं नवं संशोधन युरोपियन जर्नल ऑफ प्रीव्हेंटिव्ह कार्डिऑलॉजीमधील लेखात प्रसिद्ध झाल्याचं CNNच्या वृत्तात म्हटलं आहे. या नव्या अभ्यासासाठी संशोधकांनी 495 दाम्पत्यांसोबत 20 वर्षं संशोधन केलं. त्यानंतर असा निष्कर्ष काढला की, हृदयाचा झटका आल्यानंतर ज्यांनी पुन्हा लैंगिक आयुष्याकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना हृदयविकारानी मृत्यु येण्याचा धोका तसा निर्णय न घेणाऱ्यांच्या तुलनेत 35 टक्के कमी आहे. हृदयविकार झाल्यानंतर पुन्हा लैंगिक जीवनाकडे वळल्याने निरोगी कार्यशैली, तरुणपणा, उत्साह परत येतो व निरोगी जीवनशैली परतते, असं इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठातील प्राध्यापक यारीव गर्बर यांनी म्हटलं आहे.