The news is by your side.

आजी माजी महापौरांच्या प्रभागात विकास कामांची बोंबाबोंब* मर्जीतील लोकांना कामाचे कंत्राट,  मनपा अभियंत्याने घेतले आंधळेपणाचे सोंग!

0 74

अकोला १४ऑक्टो: – अकोला शहरातील आजी-माजी महापौरांच्या प्रभागात विकास कामाची वाट लागली असून सगळीकडे बोंबाबोंब सुरू आहे. सदर नेत्याचे राजकीय वजन पाहता या प्रभागात तक्रार करण्याची सामान्य माणसाची सध्यातरी हिंमत नाही.मिळालेल्या माहितीनुसार या प्रभागात बहुतांश भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. ज्या प्रभागात आपले खात्रीचे मतदार आहेत त्याच भागात थोडेफार विकास कामे सुरू आहेत. ही कामे करताना आपल्या मर्जीतील नातेवाईकांना विकास कामाचे कंत्राट दिल्या गेल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. प्रभागांमध्ये सुरु असलेल्या विकास कामाकडे महानगरपालिका बांधकाम अभियंत्यांनी चक्क दुर्लक्ष केले आहे. बांधकाम अभियंत्याच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.या प्रभागात होणाऱ्या आर्थिक व्यवहाराशी बांधकाम अभियंत्याचा थेट संबंध जोडला जात आहे.विशेष म्हणजे, शहराच्या काही भागात रस्त्याच्या दुतर्फा बाजूला पेवर लावण्यात आली होती. मात्र या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे ही पेवर काढून टाकण्यात आली. फुट फुट झालेली ही फेवर सध्या आजी माजी महापौरांच्या प्रभागात पोहचली आहे. याच पेवरचा आता ते वापर करणार आहेत, अशी माहीत प्राप्त झाली आहे. जुने पेवर् वापुरून नवीन पेवर लावली असा देखावा मनपाकडे देयके सादर करताना करतील यात तिळमात्र शंका नाही. या सर्व कामाची देखरेख करण्याची जबाबदारी मनपा अभियंत्याची असली तरी त्यांनी आंधळेपणा चे सोंग घेतले आहे. या प्रभागातील होणाऱ्या कामावर खर्चाचा हिशोब आता कोण विचारणार हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण आजी माजी महापौर, मनपा बांधकाम अभियंता आणि मर्जीतील कंत्राटदार या त्रिकुटाने मनपाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा चंग बांधला आहे असे दिसते. प्रभागात विकास कामे कमी, आणि घाणीचे साम्राज्य जास्त अशी या प्रभागातील एकंदरीत चित्र आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाचा या प्रभागात बोलबाला आहे हे येथे उल्लेखनीय.