The news is by your side.

ट्रक चालकाला लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांस यश

0 160

अकोला प्रतिनिधी१४ऑक्टो:- अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या, चांदुर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर, शस्त्राच्या धाकावर ट्रक चालकाला लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात, खदान पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की,अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी, शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचे आदेशीत केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, १३ऑक्टोबर रोजी खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार डीसी खंडेराव यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक गजानन चांभारे हे आपल्या पोलीस पथकासह सायंकाळी६ तेरात्री१०वाजेपर्यंत पेट्रोलिंग करीत होते.या दरम्यान रात्री९.३०वाजता दरम्यान शिवर ते हिंगणा(अहिर)या गावादरम्यान चांदुर नजीक असलेल्या कास्तकार वाईन बारच्या जवळ असलेल्या मोरणा नदीच्या पुलाजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा चालक रोडच्या मघोमध ट्रक क्रमांक लावून मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता.त्या दरम्यान पोलीस निरीक्षक डी. सी.खंडेराव आणि त्यांच्या पोलीस पथकासह त्याठिकानाहून जात होते. हा प्रकार पोलिसांनी पहिल्यावर ठाणेदार खंडेराव यांनी, ट्रक चालकाला काय प्रकार घडला, याची विचारपूस केली, त्यावर त्या ट्रक चालकाने दुचाकी क्रमांक एम.एच.३०एजे-१३४८ वर तीन तरुण आले आणि दुचाकी ट्रक समोर अचानकपणे उभी करून ट्रक थांबविण्यास भाग पाडले, आणि त्वरित गाडीच्या कॅबिन मध्ये प्रवेश करून,माझ्या शर्ट पकडून, तिघांपैकी एकाने धारदार चाकूचा धाक दाखवून, खिशातील१हजार रुपये, ट्रकच्या डिकीमधील ३हजार रुपये, असे एकूण४हजार रुपये घेऊन पळून गेलेत.त्या माहितीच्या आधारे, क्षणाचाही विलंब न करता,ट्रक चालकाने सांगिलेल्या प्रमाणे दिशेने खदान पोलिसांची गाडी सुसाट वेगाने निघाली चालकाने दिलेल्या वर्णनाच्या दुचाकीवरून तीन तरुण जात आहेत,हे पोलिसांच्या लक्षात येताच त्या दुचाकीचा पाठलाग केला असता, त्यावरील दोघेजण दुचाकीवरून उडी मारून पळून गेले,मात्र त्यापैकी २१वर्षीय अनिकेत गणेश गडवाल शिवर येथील ढोणे कॉलनीत राहणाऱ्याला लुटीच्या घटनेच्या काही वेळातच अटक केली. त्याच्या कडून ट्रक चालकाकडून लुटलेली ४हजार रुपयांची रोकड आणि लुटीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली वर नमूद क्रमांकाची पॅशन प्रो दुचाकी आणि धारधार चाकू असा एकूण ४४हजार१००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच म्हणजे१४ऑक्टोबर रोजी त्याच्या दुसरा साथीदार कुंदन शिर्केला सुद्धा अटक करण्यात आली आहे.घटनेच्या दिवशी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता,त्याला न्यायालयाने १७ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तिसऱ्या आरोपीचा सुद्धा शोध लवकरच घेऊ,असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खदान पोलिसांनी कलम ३९४ आणि बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक डीसी खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संजय गवई, पोलिस उपनिरीक्षक गजानन चांभारे, पो कॉ रवी डाबेराव ,राजेंद्र तेलगोटे, दिनकर धुरंधर, यांनी केली आहे. आरोपींनी आणखी काही ठिकाणी अशा प्रकारे गुन्हे केले आहेत का?याचा तपास पोलीस करीत आहेत.