The news is by your side.

दिड वर्षापासुन रखडले सार्वजनिक शौचालयाचे बाधंकाम! 60 लाख 91 हजार रूपयाचा निधी पडुन!

0 83

अकोट ता१६ऑक्टो:-प्रतिनिधी स्वप्नील सरकटेदेशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियाना अतंर्गत संपूर्ण देशात स्वच्छ अभियान राबवुन एक आंदोलन ऊभे केले आहे यासाठी केन्द्र सरकार कडुन स्वच्छता अभियाना करीता करोडो रूपये निधी उपल्बध करून दिला जात आहे
तर दुसरीकडे मोदीच्या नावावर निवडुण आलेले अकोटचे नगराध्यक्ष यांच्या हटयोगामुळे अकोट अजनंगाव मार्गावरील आंबोडी वेस येथील सार्वजनिक शौचालयाचे नवीन इमारतीचे बांधकाम मागील दिड वर्षापासुन रखडले आहे यासाठी कत्रांटदाराला तारीख पै तारीख वाढवुन देण्यात येत आहे.मागील दोन वर्षापासुन आबोडी वेस येथील सार्वजनिक शौचालयाच्या नवीन इमारती करीता ६० लाख ९१ हजार रूपायाचा निधी उपल्बध असुन सुद्धा कत्रांटदाराला प्रस्तावित जागेवर काम सुरू न करण्याबाबत नगराध्यक्ष तोंडी स्वरूपात आदेश देवुन मनाई करत असल्याचे बोले जात आहे तसेच नगराध्यक्षानी सार्वजनिक शौचालयाचे बाधंकामा करीता दुसरीकडे दाखवलेली जागा स्मशान भूमी जवळ असल्याने तेथील नागरीकानी शौचालय बाधंकामास विरोध दर्शविला आहे तसेच प्रस्तावित जागेतच शौचालय बाधंण्याची विनंती केली आहे स्वःता कत्रांटदाराने अकोट मुख्यधिकारी यांना मुदत वाढीकरीता दिलेल्या पत्रात मागणी केली आहे.अकोट नगर परिषद हद्यीत सार्वजनिक शौचालय बाधंकामा करीता मोठ्या प्रमाणात निधी उपल्बध झाल्याने शहरातील सुरू असलेले आंबोडी वेस ,शासकीय गोदाम जवळील शौचालय इमारत जमीन दोस्त करून नवीन इमारत बाधंण्याचा खटाटोक फक्त मलिदा लाटण्यासाठी करण्यात आला होता का असा प्रश्न निर्माण झाला असुन याबाबत सविस्तर चौकशी होणे गरजेचे बनले आहे.