The news is by your side.

कर संकलन करणे सरकारचा अधिकार

0 15

यंदा भारताने इतिहासात प्रथमच १० लाख कोटींहून अधिक रूपयांच्या प्राप्तीकराचे संकलन केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्याच पाश्र्वभूमीवर आजचा हा विषय आहे. प्रशासन चालविण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. तो नागरीकांकडून कररूपाने जी रक्कम जमा होते, त्यातूनच प्रामुख्याने होतो. कोणत्याही सरकारचा हा निश्चित स्वरूपाचा उत्पन्नस्रोत असतो. कर संकलन करणे हा सरकारचा अधिकार तर कर देणे हे जनतेचे घटनात्मक उत्तरदायित्व असते. तर असा हा कर संकलित करण्याची पद्धती अनेक सहस्र वर्षांपूर्वीपासूनची आहे. प्रत्येक मानवी संस्कृतींमध्ये कर संकलनाची पद्धती या ना त्या रूपात होतीच. ज्यावेळी ‘चलना’चा शोध लागला नव्हता, तेव्हाही वस्तूरूपात कर गोळा करण्यात येतच असे, असे संशोधनातून दिसून आले आहे. चलन निर्माण झाल्यानंतर करसंकलन सुलभ आणि अधिक प्रमाणात तसेच न्यायोचित पद्धतीने होऊ लागले असे इतिहासात डोकावल्यास दिसून येते. या कराची कहाणी मनोरंजक अशीच आहे. कर संकलनाचे महत्व फार मोठे असले तरी कर देणे ही बाब लोकांच्या फारशी आवडीची असत नाही. कराचे प्रमाण जास्त असेल तर शक्य त्या मार्गांनी तो चुकविण्याचा प्रयत्न होतो. निदानपक्षी तो कमीत कमी भरावा लागावा अशी इच्छा तरी असतेच असते. अशा या कराचा इतिहास, सद्य:स्थिती आणि माहिती करून घेणे उचित असते. त्या दिशेने केलेला हा संक्षिप्त प्रयत्नष्ठभारतापुरते बोलायचे झाल्यास कराचा प्रारंभ रामायण, महाभारत काळाच्याही पूर्वीपासून होतो. प्राचीन सिंधू संस्कृती, वेदकाळ, रामायण व महाभारत काळ, त्यानंतचा उपनिषद काळ, नंतर मौर्य, गुप्त यांची साम्राज्ये, या सर्व काळांमध्ये कर संकलन होत होते. तसे उल्लेख त्या काळचे शिलालेख इत्यादींमध्ये सापडतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्या काळात हे कर मुद्रांच्या (धातूचे चलन) व धान्याच्या स्वरूपात गोळा केले जात. या करांचे अनेक प्रकार व स्तर होते.? ऐतिहासिक काळातील सुसंघटीत आणि नियमबद्ध कर संकलन आर्य कौटिल्य चाणक्य यांच्या अर्थशास्त्रविषयक ग्रंथापासून सुरू झाले असे मानण्यात येते. कौटिल्याच्या ग्रंथात कर कोणाकडून घ्यावा, त्याचे प्रमाणे कसे ठरवावे, त्याचे संकलन कसे आणि कुणी करावे, संकलित करावर अधिकार कुणाचा, संकलित कराचा व्यय कसा करावा, आणि एकंदरीतच कर या संकल्पनेचे महत्व काय आहे, यावर प्रकाश टाकला आहे असे भाष्य अनेक तज्ञांनी केले आहे. कौटिल्याने कर संकलन आणि करांचे प्रमाण यावर जे भाष्य केले आहे, ते सांप्रतच्या काळातही तितकेच उपयुक्त आहे. कराचे प्रमाण प्रत्येक नागरिकाचे उत्पन्न आणि त्याचा खर्च यावर ठरविले जावे. त्याच प्रमाणे राजाने जनतेला भरण्यास कठीण होईल अशा प्रकारे कराचे प्रमाण निर्धारित करू नये. तसेच सर्वांना करमुक्तही ठेवू नये. कर अति जास्त असल्यास तो चुकविण्याकडे कल वाढतो आणि प्रशासनात भ्रष्टाचार माजतो. तसेच सर्वांना करमुक्त केलेल्या किंवा कर अतीकमी असल्यास राज्यकारभाराचा खर्च चालविणे अशक्य होते. राज्य कर्जबाजारी होते, तसेच लोकांमध्येही बेजबाबदारपणा वाढील लागतो, अशी मोलाची सूचना त्याने केली आहे, जी आजही खरी आहे. कर व्यवस्थापन कसे असावे याचीही सविस्तर माहिती कौटिल्याच्या ग्रंथात सापडते. कराचे प्रमाण आणि तो कोणी द्यावा याचे नियम राजाने मंत्रिमंडळाशी विचारविमर्ष करून ठरवावेत. त्याची माहिती नागरीकांना द्यावी. कर संकलनासाठी अधिकारी आणि कर्मचाNयांची नियुक्ती करावी. त्यांना करदात्यांशी समतोल वर्तणूक करण्याची सूचना करावी. प्रामाणिकपणे कर भरणाNयांचा मान राखला जावा. त्यांना विनाकारण त्रास दिला जाऊ नये. कर चुकविणाNयांवर मात्र कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठी यंत्रणा प्रस्थापित करावी. परिस्थितीप्रमाणे आणि विशिष्ट कारणांसाठी करात सूटही द्यावी. करसंकलन करणाNया प्रशासकीय अधिकाNयांनी अप्रामाणिकपणा केल्यास त्यांना अतिशय कठोर शासन करावे, असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. आश्चर्य म्हणजे आजही करसंकलन यंत्रणाही साधारणतNयाच नियमांनुसार कार्यरत आहे.औद्योगिक उत्पादनांवरील कर, शेती उत्पादनांवरील कर, खासगी संपत्तीवरील कर, व्यापारातील उत्पन्नवर कर, भूमीवरील कर, सोने चांदीच्या आभूषणांवरील कर, विविध छोटय़ा व्यवसायांवरील, शासकीय मालमत्तेच्या खासगी उपयोगावरील कर, असे करांचे विविध प्रकार चाणक्याच्या काळात होते असे दिसून येते. प्रत्येक कराचे प्रमाण निश्चित असावे आणि ते नियमानुसार असावे. करसंकलन करताना एका गटातील करदात्यांमध्ये पक्षपात करू नये. तसेच कर भरण्याचा कालावधीही आधी निश्चित करण्यात येऊन त्याची माहिती लोकांना द्यावी, असे मौलिक नियम चाणक्य कौटिल्याने निर्माण केले हाते. चंद्रगुप्ताच्या काळात (ज्याचे चाणक्य हे मार्गदर्शक होते) त्यांच्याच सूचनेनुसार भूमीवरील कर लाभाच्या एक शष्ठांश ठरविण्यात आला होता.युद्ध अगर नैसर्गिक आपदा, महापूर, दुष्काळ आदी परिस्थितीत राजाने करसंकलनाच्या बाबतीत अधिक कठोर व्हावयास हवे, असे चाणक्याने सुचविले आहे. अशा संकटाच्या काळाचा गैरलाभ उठविण्याचा आणि करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न केला जातो. तो राजाने कठोर प्रशासकीय निर्णय घेऊन हाणून पाडला पाहिजे, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.मनुस्मृती या प्राचीन गंथात, करांसंबंधी अनेक सूचना व नियम आहेत. जनतेला न सोसवेल असा करांचा भार टाकला जाऊ नये. या ग्रंथात कर कोणाकडून घ्यावा यासंबंधीही माहिती दिली असून, व्यापारी आणि कारागिर यांनी त्यांच्या लाभाच्या एक पंचमांश, अर्थात २० टक्के इतका कर द्यावा. कृषक समाजाने अर्थात शेतकNयांनी त्यांच्या लाभाच्या एक शष्ठांश, किंवा एक अष्टमांश किंवा एक दशांश इतका कर पिकपाण्याच्या परिस्थितीनुसार द्यावा अशी सूचना या ग्रंथात आहे.
साधारणतः अकराव्या शतकापासून भारतात इस्लामी राजवट सुरू झाली. इस्लामी राज्यकत्र्यांनी इतर करांबरोबरच हिंदूंवर जिझिया करही लादला होता. त्यामुळे करप्रणाली धार्मिक वळणावर गेली होती. सक्तीने कर वसुली करण्याचे प्रकार इस्लामी काळात मोठय़ा प्रमाणात घडल्याचे अनेक इतिहासकारांनी नमूद केले आहे.

आधुनिक काळातष्ठब्रिटीशांचा कालावधी

? काळात प्राप्तीकर (इनकम टॅक्स) ही संकल्पना पुनर्रचित करण्यात आली असे दिसून येते. ब्रिटीशांच्या कालावधीत भारतात प्रथम प्राप्तीकर १८६० इसवी सनात सुरू करण्यात आला. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटीश सत्तेला जे आर्थिक नुकसान सोसावे लागले त्याची भरपाई भारतातील नागरीकांकडूनच करून घेण्याच्या उद्देशाने हा कर लादण्यात आला होता. जेम्स विल्सन यांनी तो लागू केला.

? या करात प्रथम १९१८ मध्ये आणि नंतर १९२२ मध्ये सुधारणा करण्यात आली. १९२२ चा प्राप्तीकराचा कायदा १९६१-१९६२ पर्यंत अस्तित्वात होता. मात्र त्यात वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या. १९६१ मध्ये भारताने आपला स्वतःचा प्राप्तीकर कायदा तयार केला. तो १ एप्रिल १९६१ पासून लागू करण्यात आला. तो जम्मू-काश्मीरसह सर्व भारताला लागू आहे.

भारतातील करांची रचनाष्ठ

आपल्याकडे करांचे स्थूलमानाने दोन प्रकार सध्या आहेत. एक प्रत्यक्ष कर, आणि दुसरा अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करात वेतनावरील प्राप्तीकर, व्यवसाय व उद्योगांमधून मिळणा?या उत्पन्नावरील कर, घरांच्या उत्पन्नांवर कर, तर इतर उत्पन्नस्रोतांमधून (ठेवींवरील व्याज, लाभांश, भांडवलावरील उत्पन्न, जमीन विकून मिळालेले उत्पन्न इत्यादी) या सा?या करांचा समावेश प्रत्यक्ष करात करण्यात आला आहे. हा कर संकलित करण्याचे काम केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अधिपत्यात येणा?या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे सोपविण्यात आले आहे. हे मंडळ दरवर्षी ऑगस्टमध्ये त्यापूर्वीच्या वर्षात किती प्रत्यक्ष कर संकलित झाला याची माहिती देते. या माहितीच्या आधारेच यंदा विक्रमी प्रत्यक्ष कर संकलन झाल्याचे सर्वांना समजले आहे.